बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूर सध्या खूप चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने कॉन्सर्ट सुरु असताना खराब व्यवस्थापणामुळे मध्येच थांबून कॉन्सर्ट रद्द केला होता. त्यावेळी तिने चाहत्यांची माफीदेखील मागितली होती. अशातच आता पुन्हा एकदा एका लाईव्ह कॉन्सर्टमुळे ती चर्चेत आली आहे. एका लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान तिला श्वास घेण्यासाठी त्रास झाला. यामुळे तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिनहटा महोत्सवादरम्यान ती गाणं गात होती. मात्र अचानक तिला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. मॅनेजर्सने मोनाली गंभीर अवस्थेमध्ये असलेली दिसून आली. त्यामुळे लगेचच तिने परफॉर्मन्स थांबवण्याचा निर्णय घेतला. (monali thakur live concert)
अचानक तब्येत बिघडल्यामुळे मोनालीला दिनहाटा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले आहे. यावेळी तिच्या टीमने लगेचच कार्यवाही करत तिच्यावर उपचार करण्याची मागणी केली. काही मिनिटांतच एक रुग्णवाहिका आली आणि मोनालीला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या तिला कूचबिहारच्या एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरु आहेत.
मोनालीने अद्याप सोशल मीडियावर तब्येतीबद्दलचे काहीही अपडेट शेअर केले नाहीत. काही दिवसांपूर्वी तिने वाराणसी येथील खराब व्यवस्थापनामुळे कार्यक्रम रद्द केला होता. परफॉर्मन्स सुरु असताना कोणालाही इजा होऊ शकते असे ती म्हणाली होती. याचबरोबर तिने कॉन्सर्ट रद्द करत चाहत्यांची माफीदेखील मागितली होती. यावेळी कॉन्सर्टचा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. त्यावेळी ती म्हणाली की, “मी नाराज आहे. मी व माझी टीम परफॉर्म करण्यासाठी खूप खुश होतो. मात्र इथे असलेल्या सुविधांबद्दल मला काहीही बोलायचं नाही. ही इथल्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मला हे सांगता पण नाही येणार की त्यांनी पैसे चोरण्यासाठी मंचावर काय करत आहेत ते”.
पुढे ती म्हणाली होती की, “मी खूप सांगत आहे की मंच खराब असल्याने माझ्या पायाला जखम होऊ शकते. मला इतर डान्सर्स शांत राहण्यासाठी सांगत आहेत. पण इथेसगळंच बेकार आहे. तरीही आम्ही परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण तुम्ही लोक माझ्यासाठी आला आहात आणि सगळ्यांना मी उत्तर देण्यासाठी बांधील आहे. पण मी माझा कॉन्सर्ट इथेच थांबवत आहे. पण पुन्हा मी इथे येईन. पण सगळी व्यवस्था मी स्वतः करेन”. दरम्यान आता तिच्या तब्येतीबद्दल कोणतीही अपडेट समोर आली नसून चाहते ती बरी व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.