Saif Ali Khan Attacked : सैफ अली खानला तब्बल पाच दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सैफची स्टाईल पाहून लोकांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. खरं तर, सैफला गंभीर दुखापत झाल्यानंतर, हॉस्पिटलमधून बाहेर पडताना तो इतका फिट आणि देखणा दिसेल असे लोकांना वाटले नव्हते आणि सर्वात मुख्य म्हणजे, तो कोणत्याही आधाराशिवाय स्वतःहून चालताना दिसला. आता लोकांनी या विरोधात आपली मते मांडायला सुरुवात केली आहे. तेव्हा पूजा भट्टने या सगळ्या ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
सैफच्या धाडसासाठी आणि सावरण्याच्या दृढ निश्चयाबद्दल पूजा यांनी त्याचे कौतुक केले आहे. यासाठी लोकांनी त्यांचे कौतुक करावे, असेही त्यांनी म्हटले आहे. पूजा यांनी ETimes शी केलेल्या संभाषणात सांगितले की, “चाकू हल्ल्याच्या घटनेबाबत मीडियामध्ये जे तपशील समोर आले आहेत त्यामुळे सैफच्या शारीरिक स्थितीबद्दल लोकांच्या मनात एक प्रतिमा निर्माण झाली आहे. सैफला त्याच्या पायावर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना पाहून अनेकांना धक्का बसला आहे”. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक म्हणाले होते, “आम्हाला वाटले होते की तो व्हीलचेअरवर बाहेर येईल”. त्याचबरोबर काहींनी “डाळीत काहीतरी मिसळ असल्याचेही सांगितले”.
पूजा पुढे म्हणाली, “पण हे लोक हे विसरत आहेत का की त्यांनी सैफचे स्वतःहून हॉस्पिटलमध्ये गेल्याबद्दल कौतुकही केले होते? जखमी, वेदनादायक अवस्थेत स्वतःला हॉस्पिटलमध्ये दाखल करणाऱ्या व्यक्तीला हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याचे धैर्य नक्कीच असते. आपण षड्यंत्र सिद्धांताचा अवलंब करण्याऐवजी याचे कौतुक केले पाहिजे”. असं म्हणत पूजा भट्ट यांनी सैफचे कौतुक केले आणि ट्रोलर्सलाही त्याच्या कामगिरीच कौतुक करण्याचं आवाहन दिलं.
आणखी वाचा – प्रसिद्ध गायिका मोनाली ठाकूरची लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान बिघडली तब्येत, श्वास घेण्यासाठी त्रास, रुग्णालयात दाखल
पांढरा शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये सैफ हॉस्पिटलमधून बाहेर आला तेव्हा त्याच्या हातावर प्लास्टर आणि मानेवर पट्टी होती. सैफ अली खान मंगळवारी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घरी परतला. गेल्या गुरुवारी रात्री एका घुसखोराने सैफच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोराचा हेतू चोरीचा असला तरी तो सैफसमोर आला आणि त्यानंतर त्याने अभिनेत्यावर चाकूने सहा वार केले. मात्र, चोरट्याला पोलिसांनी पकडले आहे.