शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आदित्य नारायणच्या ‘त्या’ कृतीमागील सत्य आलं समोर, मॅनेजरने खुलासा करत म्हटलं “सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 14, 2024 | 3:53 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bollywood singer aditya narayan concert manager supports to singer on viral video of hitting fan with mic

आदित्य नारायणच्या ‘त्या’ कृतीमागील सत्य आलं समोर, मॅनेजरने खुलासा करत म्हटलं "सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण..."

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा आदित्य नारायण हादेखील सिनेसृष्टीत त्यांचे स्थान निर्माण करु पाहत आहे, आदित्यचा आवाजही त्याच्या वडिलांसारखाच सुमधुर असल्याने तो अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करत असतो. मात्र आपल्या गाण्यापेक्षा नुकत्याच केलेल्या एका कृतीमुळे आदित्यला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

छत्तीसगढमधील एका महाविद्यालयात आदित्यचा कॉन्सर्ट सुरु होता. त्यावेळी परफॉर्मन्स सुरु असताना त्यानं चाहत्यावर माईक फेकून मारल्याची घटना घडली. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदित्यवर वेगवेगळ्या प्रकारे टीका करण्यात आली होती. या सगळ्यात ज्याने कॉन्सर्ट आयोजित केली होती, त्या इव्हेंट मॅनेजरनं आता याप्रकरणी खुलासा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Agarwal Jha (@shwetaagarwaljha)

आणखी वाचा – अशी ही लव्हस्टोरी! ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त अतुल परचुरेंनी पत्नीबद्दल व्यक्त केली प्रेमभावना, म्हणाले, “सोनियाशी लग्न करणं…”

‘झूम टीव्ही’शी बोलताना इव्हेंट मॅनेजर म्हणाला, “तो मुलगा त्या कॉलेजचा विद्यार्थीही नसून तो कुणीतरी बाहेरील मुलगा होता. तो सतत आदित्यचे पाय ओढत होता. त्याने आदित्यच्या पायावर अनेकवेळा आपला फोनही मारला. त्यामुळे आदित्यचा संयम तुटला. या घटनेनंतर पुढे कॉन्सर्ट सुरू झाला. सुमारे दोन तास हा कॉन्सर्ट चालला.”

आणखी वाचा – यंदाच्या वर्षीही प्राजक्ता माळी सिंगल?, ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त स्वत:च खुलासा करत म्हणाली, “प्रेम करु..”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “ लोकांना प्रत्येक गोष्टीमागील सत्य माहित नसते.  तो आदित्यला सतत मारत होता आणि खेचत होता. यामुळे आदित्य पडला असता तर? आणि जर हा मुलगा बरोबर असता तर त्याने पुढे येऊन कॉलेजच्या व्यवस्थापक किंवा शिक्षकांना या प्रकाराबाबत सांगितले असते. आदित्यनं सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तो सारखाच त्रास देत असल्यानं आदित्यला राग अनावर झाला.”

Tags: Aditya NarayanBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsbollywood singerentertainment newsआदित्य नारायणबॉलिवूड गायकबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजनमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Siddharth Bodke Propose Titeeksha Tawde

Video : सिद्धार्थने प्रपोज करत तितीक्षाला दिलं 'हे' खास सरप्राइज, 'व्हॅलेंटाईन डे'निमित्त दाखवली झलक, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.