बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा आदित्य नारायण हादेखील सिनेसृष्टीत त्यांचे स्थान निर्माण करु पाहत आहे, आदित्यचा आवाजही त्याच्या वडिलांसारखाच सुमधुर असल्याने तो अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करत असतो. मात्र आपल्या गाण्यापेक्षा नुकत्याच केलेल्या एका कृतीमुळे आदित्यला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
छत्तीसगढमधील एका महाविद्यालयात आदित्यचा कॉन्सर्ट सुरु होता. त्यावेळी परफॉर्मन्स सुरु असताना त्यानं चाहत्यावर माईक फेकून मारल्याची घटना घडली. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आदित्यवर वेगवेगळ्या प्रकारे टीका करण्यात आली होती. या सगळ्यात ज्याने कॉन्सर्ट आयोजित केली होती, त्या इव्हेंट मॅनेजरनं आता याप्रकरणी खुलासा केला आहे.
‘झूम टीव्ही’शी बोलताना इव्हेंट मॅनेजर म्हणाला, “तो मुलगा त्या कॉलेजचा विद्यार्थीही नसून तो कुणीतरी बाहेरील मुलगा होता. तो सतत आदित्यचे पाय ओढत होता. त्याने आदित्यच्या पायावर अनेकवेळा आपला फोनही मारला. त्यामुळे आदित्यचा संयम तुटला. या घटनेनंतर पुढे कॉन्सर्ट सुरू झाला. सुमारे दोन तास हा कॉन्सर्ट चालला.”
आणखी वाचा – यंदाच्या वर्षीही प्राजक्ता माळी सिंगल?, ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त स्वत:च खुलासा करत म्हणाली, “प्रेम करु..”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “ लोकांना प्रत्येक गोष्टीमागील सत्य माहित नसते. तो आदित्यला सतत मारत होता आणि खेचत होता. यामुळे आदित्य पडला असता तर? आणि जर हा मुलगा बरोबर असता तर त्याने पुढे येऊन कॉलेजच्या व्यवस्थापक किंवा शिक्षकांना या प्रकाराबाबत सांगितले असते. आदित्यनं सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तो सारखाच त्रास देत असल्यानं आदित्यला राग अनावर झाला.”