शनिवार, सप्टेंबर 5, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अशी ही लव्हस्टोरी! ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त अतुल परचुरेंनी पत्नीबद्दल व्यक्त केली प्रेमभावना, म्हणाले, “सोनियाशी लग्न करणं…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 14, 2024 | 2:11 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actor Atul Parchure expressed his love for wife Sonia on Valentines Day

अशी ही लव्हस्टोरी! ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त अतुल परचुरेंनी पत्नीबद्दल व्यक्त केली प्रेमभावना, म्हणाले, “सोनियाशी लग्न करणं...”

जगभरात आजचा १४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोड्या आपले जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वात अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या जोडीदारांबरोबर सात जन्माची गाठ बांधली. मराठीतील अशा अनेक कलाकार जोडयांपैकी एक लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेते अतुल परचुरे व नृत्यांगणा, अभिनेत्री सोनिया परचुरे. आजच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त या कलाकार जोडीने ‘महाराष्ट्र टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या सुखी संसाराबद्दल सांगितले आहे.

यावेळी अतुल परचुरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत असे म्हटले की, “सोनियाचं लग्नाआधीचं आयुष्य बंगल्यात गेलं होतं आणि मी दोन खोल्यांमध्ये राहिलेला माणूस. पण लग्नानंतर त्या जागेत कोणतीही तक्रार न करता सोनिया राहिली. त्यावेळी मी तिला ‘आपण लवकरात लवकर नवीन घर घेऊ’ असं विश्वासानं सांगितलं होतं. मी आणि सोनिया एकाच क्षेत्रात काम करायचो; पण दोघंही एकाच क्षेत्रात नको म्हणून तिनं नाटक, चित्रपट, मालिकेतलं काम पूर्ण बंद केलं आणि नव्यानं तिच्या कथक क्लासेसच्या करिअरला सुरुवात केली. तिच्या या धाडसी निर्णयाचा मला आजही अभिमान वाटतो.”

View this post on Instagram

A post shared by Sonia Parchure (@soniaparchure)

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “अभिनयक्षेत्रात आर्थिक स्थैर्य नसतं. आज काम आहे तर उद्या नाही. पण सोनियाकडे ते स्थैर्य होतं. आम्हा दोघांमध्ये कोण किती कमवतं यावर कधीही चर्चा झाली नाही. उलट आम्ही एकमेकांसाठी पैसे गुंतवत असतो. मी चार महिने रुग्णालयात होतो, तेव्हा वर्षभर माझं काम बंद होतं. तेव्हा मी पूर्ण बरा होईपर्यंत घर, स्वत:चं करिअर सांभाळणं, संपूर्ण कुटुंबाला धीर देणे तसेच त्या परिस्थितीत तिने खंबीरपणे सगळ्या गोष्टी पार पाडल्या”.

आणखी वाचा – यंदाच्या वर्षीही प्राजक्ता माळी सिंगल?, ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त स्वत:च खुलासा करत म्हणाली, “प्रेम करु..”

यापुढे अतुल यांनी त्यांच्या सुखी संसाराचे गुपित सांगत असे म्हटले की, “आम्ही एकमेकांवर आमच्या आवडीनिवडी, मतं कधी लादली नाहीत. मला मित्रांबरोबर बाहेर जायचं असेल तर कधीही तिच्याशी खोटं बोलण्याची वेळ येत नाही. उलट ती मला सांगत असते की, मित्रांबरोबर तुझा छान वेळ जातो, तर तू आनंदानं त्यांना भेटायला जात जा.”

आणखी वाचा – ना वाद, ना मतभेद, तरीही घटस्फोट अन्…; आमिर खानबरोबरच्या नात्यावर किरण रावचं भाष्य, म्हणाली, “एक कुटुंब म्हणून…”

यापुढे अतुल यांनी सोनिया यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करत असं म्हटलं की, “सोनियाशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय होता. त्याचा मला कधीही पश्चाताप झाला नाही आणि होणारही नाही. माझ्यासारख्या आज वेगळं आणि उद्या वेगळं असं वागणाऱ्या माणसाला इतकी वर्षं तिनं सांभाळलं याबद्दल मी तिचा कायम आभारी आहे”.

Tags: सोनिया परचुरेअतुल परचुरेमराठी अभिनेतेमराठी अभिनेत्रीमराठी मनोरंजनमराठी बातमीatul parchuremarathi actorsMarathi Actressesmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsSonia Parchure
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Bobby deol on twinkle khanna

बॉबी देओल व ट्विंकल खन्ना यांच्यात एकेकाळी होता अबोला, पण 'त्या' प्रसंगानंतर झाले जिवलग मित्र, २८ वर्षांनी अभिनेत्याने केला खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.