मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमिताभ बच्चन यांनी घरासमोर बांधलं आहे सुंदर मंदिर, संगमरवरी खडकाचा वापर, शिवलिंगावर जलाभिषेक करतानाचा फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 17, 2024 | 4:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amitabh bachchan house mandir

अमिताभ बच्चन यांनी घरासमोर बांधलं आहे सुंदर मंदिर, संगमरवरी खडकाचा वापर, शिवलिंगावर जलाभिषेक करतानाचा फोटो व्हायरल

 बॉलीवूड शहनशाह म्हणून अमिताभ बच्चन यांचे नाव घेतले जाते. १९६९ साली त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासस सुरुवात केली. चित्रपट कारकिर्दीला सुरवात केल्यानंतर त्यांचे अनेक चित्रपट अयशस्वीदेखील झाले. मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी अपयशाला मागे टाकत चित्रपटसृष्टीमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. वयाच्या ८१व्या वर्षीही ते काम करताना दिसतात. अभिनयाबरोबरच ते सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ब्लॉगच्या माध्यमातून ते चाहत्यांबरोबर सतत काही ना काही शेअर करत असतात. अशातच त्यांच्या घरातील काही फोटो समोर आले आहेत. (amitabh bachchan house mandir )

अमिताभ यांनी आजपर्यंत त्यांच्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘जलसा’ बंगल्यातील भव्य मंदिराची झलक बघायला मिळत आहे.  रविवारी त्यांनी पुन्हा एकदा मंदिराचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी मंदिरात देवांच्या मूर्ती असल्याचेही सांगितले. प्रामुख्याने तिथे असलेल्या शिवलिंगाकडे लक्ष गेले.

आणखी वाचा – अभिमानास्पद! दाक्षिणात्य चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून प्रविण तरडेंची एन्ट्री, लूकने वेधलं लक्ष, म्हणाले, “मराठी बरोबरच…”

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बिग बी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते स्वतः मंदिरातील शिव लिंगाची पूजा करताना दिसत आहेत. संगमरवराने तयार केलेल्या मंदिरातील शिवलिंगावर जल अर्पण करताना दिसत आहेत. हे मंदिर किती सुंदर पद्धतीने सजवले गेले हे फोटो पाहिल्यावर लक्षात येते. मंदिराच्या चारही बाजूना झाडे असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर दिसत आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर…’मधील अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील लेकाने त्याला दिलं गोड सरप्राइज, केलं असं काही की…; अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

अमिताभ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ते टायगर श्रॉफ व कृती सेनन यांच्या ‘गणपथ’ या चित्रपटामध्ये दिसून आले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. आता त्यांचा ‘कल्की २८९८ एडी’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर प्रभास, दीपिका पडूकोण व दिशा पाटनी यांच्या मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन करणार असून हा चित्रपट २७ जून २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Tags: amitabh bacchanhomemandir
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Appi Amchi Collector serial Simba aka Sairaj Kendre’s father plays the role of a kidnapper.

'अप्पी आमची कलेक्टर'मधील सिंबाच्या खऱ्या आयुष्यातील वडिलांचीही मालिकेत भूमिका, लेकाबरोबर 'त्या' सीनेमध्ये दिसले, कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.