गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

किळसवाणा प्रकार! सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा आमिर खान, यामागे होतं भलतंच कारण, अभिनेत्याला मारण्यासाठी धावली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 22, 2024 | 5:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aamir Khan Incident

किळसवाणा प्रकार! सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या हातावर थुंकायचा आमिर खान, यामागे होतं भलतंच कारण, अभिनेत्याला मारण्यासाठी धावली अन्...

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आजवर त्याच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सिनेसृष्टीतही तो त्याच्या उत्कृष्ट कामासाठी प्रसिद्ध आहे. आमिर खानचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. मात्र या सुपरस्टारशी संबंधित एका विचित्र किस्स्याने साऱ्यांना धक्का बसेल. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आमिर खान चित्रपटातील आपल्या फिल्मी हिरोइन्सच्या हातावर थुंकायचा. या त्याच्या कृतीमुळे त्याचे अनेकदा जुही चावलाबरोबर बरेच भांडणही झाले आहे. (Aamir Khan Incident)

‘इश्क’ चित्रपटाच्या सेटवर आमिरने जुही चावलाला सांगितले की, मला हात कसे पहायचे हे माहित आहे. अशा स्थितीत जुहीने तिच्या दिशेने हात पुढे करताच तो अभिनेत्रीच्या हातावर थुंकला आणि नंतर तेथून त्याने पळ काढला. आमिरच्या या कृतीने जुही इतकी नाराज झाली की, दुसऱ्या दिवशी ती शूटिंगसाठी आलीच नाही. अशा स्थितीत आमिरही तिच्यावर चिडला आणि त्यानंतर वर्षानुवर्षे दोघांमधील संवाद थांबला. मात्र, आता दोघांमध्ये चांगली मैत्री आहे.

आणखी वाचा – Video : …अन् रस्त्यावर उभ्या असलेल्या मुलांना बॉबी देओलने दिल्या ५०० रुपयांच्या नोटा, अभिनेत्याचा मोठं मन पाहून कौतुकाचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल

आमिरने हा प्रॅन्क ‘धकधक’ गर्ल माधुरी दीक्षितबरोबरही पुन्हा केला होता. ‘दिल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने माधुरीला सांगितले होते की, तो तिच्या हाताकडे पाहून भविष्य सांगू शकतो. हे ऐकून अभिनेत्री खूप उत्साहित झाली आणि तिने आमिरला हात दाखवला. पण तिने हात पुढे करताच आमिर तिच्या तळहातावर थुंकला. यानंतर माधुरी चांगलीच संतापली आणि ती हॉकी स्टिक घेऊन आमिरच्या मागे धावली.

आणखी वाचा – तब्बल सात वर्ष दुसऱ्या मुलासाठी राणी मुखर्जीने केले प्रयत्न, गर्भपातही झाला आणि…; अभिनेत्रीची झाली होती विचित्र अवस्था

आमिरच्या या विचित्र वागण्याचा खुलासा खुद्द अभिनेत्याने सलमान खानच्या ‘दस का दम’ या शोमध्ये केला होता. आमिरने सांगितले होते की, तो हिरोईनला भविष्य सांगतो असा बहाणा करत त्यांच्या हातावर थुंकायचा. ‘मी ज्यांच्या हातावर थुंकलो त्या सगळ्या नायिका सुपरहिट झाल्या’, असे आमिर गमतीने म्हणाला. आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो ‘लापता लेडीज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिरने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर त्याची माजी पत्नी किरण राव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Tags: aamir khanaamir khan actoraamir khan incidententertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
shark tank new pitch

'शार्क टँक इंडिया'मध्ये लव मेकिंग सोफा घेऊन आला व्यावसायिक, घडलं काही भलतंच, या सोफामध्ये नक्की काय होतं खास?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.