टेलिव्हिजनवर सुरू असलेला ‘शार्क टॅंक’ हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या ‘शार्क टॅंक’चा तिसरा सीजन सुरु आहे. यामध्ये शार्क्स नवीन स्टार्टअप्सना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आकर्षक ऑफर देतात. या शोमध्ये नुकतेच एका व्यवसायिकाचे पिच अधिक चर्चेत आले आहे. हा व्यावसायिक आला तेव्हा तेव्हा त्याचे प्रोडक्ट बघून शार्क्स आचंबित झाले. एपिसोडचे तिसरे पिच सुरू होणार होते पण मंचावर ठेवलेल्या वस्तूंकडे बघून सर्वात आधी शार्क्सना हसू आवरलं नाही. ‘शार्क टॅंक’च्या एपिसोडमध्ये नक्की काय घडलं हे जाणून घेऊया. (shark tank new pitch)
‘शार्क टॅंक’च्या तिसऱ्या सीजनमधील एक एपिसोड सुरू असताना तिसरा पिचर येतो. तेव्हा तिथे ‘लुवोटिका’नावाचे लव्ह मेकिंग फर्निचर ठेवलेले होते. तेथे नमिता व विनीता येतात आणि फर्निचर पाहून आश्चर्यचकित होतात. तेव्हा त्या दोघी रितेशला विचारतात, “तुमचं लग्न झालं आहे त्यामुळे हे नक्की काय आहे हे सांगू शकता का?”, तेव्हा रितेश त्यावर उत्तर देत म्हणतो, “मला काय माहीत?”. त्यानंतर पिचर म्हणजे ‘लुवोटीका’चे संस्थापक दलिप कुमार तेथे आल्यानंतर सगळे आपले हसू आवरण्यासाठी प्रयत्न करतात. दलिप नंतर आपल्या उत्पादनाबद्दल सांगू लागतात. ही सर्व उत्पादने प्रणय, ध्यान व योगावर आधारित असल्याचे सांगतात. तसेच यासाठी २ कोटी रुपयांसाठी १०% इक्विटीची मागणी करतात.
आणखी वाचा – “माणूस मेला आणि तिला दूध देत आहात”, आशुतोषच्या अपघाताचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, अरुंधतीची विचित्र अवस्था पाहून म्हणाले, “हे सगळं…”
त्यांचे पिच ऐकल्यानंतर अनुप मित्तल दलिप यांना म्हणतात की, “कामसूत्राने प्रेरित असलेले दलिप कुमार, तुमचे शार्क टॅंक इंडियामध्ये स्वागत आहे. तुमचं लग्न झालं आहे का?” त्यावर दलिप उत्तर देतात, “हो माझं लग्न झालं आहे आणि मी ३९ वर्षांचा आहे”. तसेच रिक्लायनर पाहून नमिता विचारते की, “तुमच्या घरी कोणी नातवाईक आले तर हे तुम्ही त्यांच्यासमोर कसे ठेवाल?”, त्यावर पिचर म्हणतो, “हे तुम्ही आराम करण्यासाठी देखील वापरू शकता. त्यावर अनुप त्यांना म्हणतात की, “तुम्ही मला प्रणयाबद्दल चांगले काही सांगितले आणि दुसऱ्या दिवशी तुमचा नातेवाईक येणार असेल आणि तो तुमच्या या सीटवर बसला असेल तर तुम्हाला काय दिसेल ? तुम्ही त्यांना बघाल? तुमच्यामुळे सगळ्यांची नियत खारब होऊ शकते. कुटुंब देखील तुटू शकते”.
नमितादेखील अनुपचे समर्थन करत म्हणते की, “गेल्या काही वर्षांमध्ये जोडप्यांमधील प्रेम कमी झालं आहे. तनाव वाढला आहे. पण प्रणयासाठी फर्निचर वापरणे हा पर्याय नाही”. त्यामुळे सगळे शार्क्स दलिप यांना त्यांच्या उत्पादनावर पुन्हा विचार करण्यास सांगतात आणि त्यांना कोणतीही ऑफर मिळत नाही.