मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नानंतर लगेचच पतीचे निधन, आयुष्य संपवण्याचा विचार आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा कठीण काळ, नशीब चमकलं जेव्हा…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 8, 2025 | 3:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vidya Malvade Struggle

लग्नानंतर लगेचच पतीचे निधन, आयुष्य संपवण्याचा विचार आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा कठीण काळ, नशीब चमकलं जेव्हा…

Vidya Malvade Struggle : बॉलिवूडच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसणारी एक हसीना तिच्या आयुष्यात बर्‍याच अडचणींचा सामना करीत होती. शाहरुख खानबरोबर काम करणाऱ्या या अभिनेत्रीबरोबर २७ वर्षांची असताना मोठी घटना घडली. याने त्या अभिनेत्रीवर आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण तेव्हा तिच्या पतीचे निधन झाले. यानंतर अभिनेत्री पूर्णतः खचली. त्यानंतर तिला तिचे आयुष्य संपवायचे होते, परंतु असे काहीतरी घडले की तिने आपला निर्णय बदलला. ही अभिनेत्री म्हणजे विद्या मालवाडे. विद्याबरोबर फार लहान वयात वाईट घडलं. या धक्क्याचा सुरुवातीला अभिनेत्री त्रास झाला मात्र काही कालावधीनंतर तिने स्वतःला सावरलं.

अभिनेत्री विद्या मालवाडेने २००३ मध्ये अभिनय करिअर सुरु केले. विद्या ‘चक दे इंडिया’, ‘किडनॅप’ आणि ‘नो प्रॉब्लेम’ या चित्रपटांमध्ये दिसली आहे. १९९७ मध्ये विद्याने कॅप्टन अरविंद सिंह बग्गा यांच्याशी प्रेमविवाह केला. दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी होते. परंतु २००० मध्ये, अभिनेत्रीच्या आयुष्यात दु: खाचा डोंगर कोसळला जेव्हा ती २७ वर्षांची होती, तेव्हा तिच्या पतीचा विमान अपघातात मृत्यू झाला.

आणखी वाचा – “मीच तिची खरी काठी होते”, मोनिका दबडेचं होतं पूर्णा आजीबरोबर खास बॉण्ड, भावुक होत म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

अभिनेत्रीचा नवरा त्या विमानाचा पायलट होता. वडिलांच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीला स्वत: ला संपवायचे होते. एका मुलाखतीत ती म्हणाली की, ती नैराश्यात गेली होती. विद्याने म्हटले होते की तिने जगण्याची आपली इच्छा सोडली होती. तिने झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. नंतर, तिच्या पालकांचा चेहरा पाहून, मन बदलले. अभिनेत्रीने तिच्या आयुष्याला दुसरी संधी दिली आणि मॉडेलिंगच्या दिशेने आपली पावले वळविली.

आणखी वाचा – “आनंद कमी आणि…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिकेतील वातावरणाबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “इतकं रोबोटिक…”

यानंतर, तिने चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आणि २००३ मध्ये ‘इंतहा’ सह सिनेविश्वात पदार्पण केले. जेव्हा तिचे आयुष्य रुळावर आले तेव्हा तिची भेट दिग्दर्शक संजय दायमा यांच्याशी झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी २००९ मध्ये लग्न केले.

Tags: actress strugglebollywood actressVidya Malvade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
zakir khan big announcement

दिवसाला २-३ शो, रात्री झोप नाही आणि…; झाकीर खानचा मोठा निर्णय, म्हणाला, "गोष्टी हाताबाहेर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.