मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिवसाला २-३ शो, रात्री झोप नाही आणि…; झाकीर खानचा मोठा निर्णय, म्हणाला, “गोष्टी हाताबाहेर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 8, 2025 | 4:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
zakir khan big announcement

दिवसाला २-३ शो, रात्री झोप नाही आणि…; झाकीर खानचा मोठा निर्णय, म्हणाला, "गोष्टी हाताबाहेर…"

zakir khan big announcement : झाकीर खान एक प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता आहे. लोकांना त्याला पाहायला आणि ऐकायला आवडते. पण आता त्याने अशी बातमी दिली आहे, ज्यामुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. त्याने जाहीर केले आहे की, तो आपल्या दौर्‍यावरुन आणि स्टेजपासून ब्रेक घेत आहे. त्याने ही माहिती सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत दिली आहे. यामागील कारण देखील त्याने उघड झाले आहे. त्याने कामापासून अंतर ठेवण्याचा निर्णय का घेतला याबाबत झाकीर खानने स्पष्टपणे भाष्य केलं आहे. झाकीर खानने इन्स्टाग्रामवर ‘हेल्थ अपडेट’ शेअर केली आहे.

३८ वर्षीय या कॉमेडियनने पोस्टद्वारे असं नोंदवले की सतत स्टेज शो आणि व्यस्त वेळापत्रकांमुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. त्याला एका वर्षापेक्षा जास्त काळ अस्वस्थ वाटत होते, परंतु व्यावसायिक वचनबद्धतेमुळे तो सतत काम करत राहिला. मात्र आता सततच्या कामामुळे त्याला आरोग्याशी निगडित अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यादरम्यान अभिनेत्याने मोठा ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे.

आणखी वाचा – “आनंद कमी आणि…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं मालिकेतील वातावरणाबाबत धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, “इतकं रोबोटिक…”

त्यानं सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत लिहिले, “मी १० वर्षांपासून सतत दौरे करीत आहे. मला तुमचं प्रेम आणि आपुलकी मिळाली, हे माझं भाग्यच आहे. पण इतके दौरे करणं आरोग्यासाठी चांगलं नाही. लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न, दिवसाला २-३ शो, रात्री झोप नसणं, सकाळी लवकर विमानाने प्रवास आणि जेवणाच्या अनियमित वेळा यांमुळे एक वर्षापासून माझं आरोग्य बिघडले आहे. तरीही कामाची गरज असल्यामुळे मी काम करीत राहिलो”.

आणखी वाचा – लग्नानंतर लगेचच पतीचे निधन, आयुष्य संपवण्याचा विचार आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा कठीण काळ, नशीब चमकलं जेव्हा…

झाकीरनं कबूल केलं की, त्याला लाइव्ह परफॉर्म करायला आवडत असलं तरी व्यस्त शेड्युलपेक्षा त्याच्या आरोग्याला प्राधान्य देणं आवश्यक आहे. तो पुढे म्हणाला, “मला स्टेजवर राहायला आवडतं; पण आता मला ब्रेक घ्यावा लागेल. माझं मन नाही आहे हे करायचं. खरंतर, मी ते एक वर्षापासून पुढे ढकलत होतो; पण आता मला वाटतं की, गोष्टी हाताबाहेर जाण्यापूर्वी मी ते सांभाळले पाहिजे. म्हणून यावेळी मी भारतातील मर्यादित शहरांचाच दौरा करीन. मी जास्त शो करु शकणार नाही आणि हा खास रेकॉर्ड केल्यानंतर मला दीर्घ ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे”.

Tags: comedianentertainmentzakir khan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
akash nalawade news

कुणी तरी येणार येणार गं…; लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच होणार बाबा, प्रेग्नन्सी किट दाखवत दिली गुडन्यूज

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.