Monika Dabade On Jyoti Chandekar : मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाने दिग्गज स्थान मिळवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी प्रत्येकाच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. प्रेक्षकांच्या हृदयात आजही त्यांच्या बहुतेक भूमिका घर करुन बसल्या आहेत. हिंदी, मराठी सिनेविश्वात त्यांनी बरंच काम केलं. तसेच रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाने साऱ्यांना वेड केलं. मात्र काही काळापासून ज्योती चांदेकर या आजारी होत्या. त्यांच्या बऱ्याच शस्त्रक्रियाही झाल्या होत्या. या सगळ्यातून त्या खंबीरपणे बाहेर येत शूटिंग करत होत्या. अभिनय करताना त्यांनी कधीच आजारपणाच कारण देत नकार दिलेला नाही, आणि यामुळेच त्यांचं अभिनयावरील प्रेम स्पष्टपणे दिसून आलं.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत त्यांनी साकारलेली ‘पूर्णा आजी’ ही भूमिका विशेष गाजली. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. मालिकेतील इतर कलाकारांनाही ‘पूर्णा आजी’ या व्यक्तिरेखेने इतकं जवळ केलं की आजही ते तिच्या आठवणींनी भावूक होतात. तर त्याच मालिकेतील अस्मिताची भूमिका साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री मोनिका दबडेने नुकताच तिच्या YouTube चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत पूर्णा आजीशी असलेल्या तिच्या खास नात्याविषयी सांगितलं.
आणखी वाचा – “लालबागचा राजा गरीबांचा का फक्त VVIP चाच?”, दर्शनावेळी दुजाभाव करताच भाविक भडकले, थेट व्हिडीओ शेअर
मोनिका या व्हिडीओमध्ये म्हणाली, “पूर्णा आजी आणि मी नेहमी एकत्र असायचो, खूप गप्पा मारायचो. ती माझे खूप लाड करायची. मालिकेच्या सेटवर माझं पहिल्यांदा जर कोणाशी चांगलं बॉण्ड झालं असेल तर ते पूर्णा आजींबरोबर. मालिकेत तिच्या हातात काठी येण्याआधी मीच तिची खरी काठी होते. ‘तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळतं’ हे वाक्य ती नेहमी मला सांगायची. आणि पूर्णा आजीचं हेच वाक्य मी माझ्या आयुष्यात नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करेन”.
आणखी वाचा – पोटावर लाथा मारल्या, चेहऱ्याला टाके पडले आणि…; अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडकडून छळ, स्वतःच म्हणाली, “वजन कमी…”
मोनिकाने सांगितलेल्या या आठवणींनी चाहते भारावले. फक्त मोनिका नव्हे तर जुई गडकरी, अमित भानुशाली, प्राजक्ता दिघे, दिग्दर्शक सचिन गोखले आणि संपूर्ण टीम पूर्णा आजीविषयी बोलताना गहिवरुन आलेली पाहायला मिळाली.





