बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी पहाटे झालेल्या हल्ल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. अशातच आता हल्ल्याप्रकरणी अनेक खुलासे केले जात आहेत. सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेबाबत कर्मचारी एलियामाने पोलिसांत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. एलियामाच्या वक्तव्यानुसार, हल्ल्यापूर्वी आरोपीने सैफ अली खानला धमकावले होते आणि पैसेही मागितले होते. तसंच हल्लेखोराचा जेहवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. असेही म्हटलं जात आहे. एलियामाच्या वक्तव्यानुसार, आरोपीने केवळ सैफ अली खानलाच जखमी केले नाही, तर सैफ खोलीत येण्यापूर्वीच तो जेहच्या दिशेने निघाला होता. (saif ali khan attack fir copy)
• एलियामाच्या म्हणण्यानुसार, तिला अचानक एका आवाजाने जाग आली आणि तिने पाहिले की, बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि लाईट चालू होती.
• सुरुवातीला एलियामाला वाटले की, करीना आपला मुलगा जेहला भेटायला आली असावी, पण तिला काहीतरी गडबड आहे असे वाटल्यावर ती डोकावून पाहण्यासाठी बाथरूमकडे गेली.
• तिथे त्याला टोपी घातलेली सावली दिसली, जी बाथरूममधून बाहेर पडली आणि जेहच्या दिशेने जाऊ लागली.
• हे पाहून एलियामा घाबरली आणि जेहच्या दिशेने धावली. त्यानंतर आरोपीने तिला गप्प राहण्यास सांगितले.
• हा आवाज ऐकून जेहाची आया जागी झाली. तेव्हा त्या माणसाने तिला “आवाज नका करु आणि कोणी बाहेर जाणार नाही” असं म्हणत धमकावलं.
• पुढे एलियामाने असेही सांगितले की, यावेळी तो जेहच्या दिशेने जात होता आणि ती त्याच्याकडे जाण्यासाठी धावली तेव्हा तो तिच्याकडे धावला.
• त्या व्यक्तीच्या एका हातात लाकूड आणि दुसऱ्या हातात हेक्साब्लेड असे काहीतरी धारदार शस्त्र होते.
• जेव्हा तो इसम एलियामाच्या दिशेने आला तेव्हा दोघांमध्ये हाणामारी झाली, ज्यामध्ये एलियामाच्या हाताच्या मधले बोट हल्लेखोराच्या हेक्सब्लेडने आदळले. त्यामुळे त्याला दुखापत झाली.

saif ali khan attack fir copy
आणखी वाचा – 17 January Horoscope : मेष, सिंह, धनु व कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्रवारचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या…
• या हाणामारीत एलियामाने हल्लेखोराला काय हवे आहे, असे विचारले असता त्याने एक कोटी रुपयांची मागणी केली
• त्याचवेळी संधी साधुन जुनु ओरडत रूमच्या बाहेर गेली. तिचा आवाज एकुन सैफ सर व करीना मॅडम धावत रूम मध्ये आले.
• त्या इसमास बघुन सैफ अली खानने त्याला “कोण है?, क्या चाहिए?” असे विचारले, तेव्हा त्याने हातातील लाकडी वस्तु व हेक्सा ब्लेडसारख्या हत्याराने सैफ सरांवर हल्ला केला.
दरम्यान, पोलिसांनी दरोडा, घुसखोरी आणि गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्याप संशयितास अटक केलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे संपूर्ण चोरीचे प्रकरण असल्याचे दिसते. पोलिसांची 10 पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत.