Ranbir Kapoor And Alia Bhatt New Bungalow : कलाकार मंडळींच्या आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी चाहते मंडळी नेहमीच उत्सुक असतात. अनेक कलाकार त्यांच्या चाहत्यांसह नेहमीच काही ना काही शेअर करत असतात. विशेषतः बॉलिवूड कलाकारांबाबत त्यांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यास साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेली असते. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट ही जोडी नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तर त्यांची लेक राहा कपूरमुळेही कपूर कुटुंब नेहमीच चर्चेत असलेलं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नव्या घराची मागील अनेक महिने चर्चा होती.
बऱ्याच दिवसांपासून आलिया व रणबीर यांच्या घराचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरु होतं. आलिया प्रेग्नंट असल्यापासून ते साइट विझीट करताना दिसले. राहाचा जन्म झाल्यानंतरही दोघे तिला घेऊन नव्या घरी गेले होते. मुंबईतील वांद्रे येथे त्यांचा हा नवा बंगला सुरु झाला आहे. त्यांच्या या आलिशान बंगल्याची किंमत २५० कोटी रुपये असल्याची बातमी समोर आली. हा बंगला शाहरुखच्या मन्नत बंगल्यापेक्षा महाग असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्याची कर्करोगामुळे वाईट अवस्था, ओळखणंही झालं कठीण, व्हिडीओद्वारे दाखवली सत्य परिस्थिती
आलिया आणि रणबीर कपूरचं नवीन घर अखेर तयार झालं आहे. या घराची पहिली झलक समोर आली आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे नवीन घर जवळपास तयार झाले असून लवकर हे कुटुंब या घरात राहायला जाण्यास सज्ज होणार आहेत. या बहुमजली घराचे बांधकाम गेल्या काही काळापासून सुरु आहे परंतु अहवालानुसार, हे जोडपे या वर्षी दिवाळी किंवा ख्रिसमसच्या आसपास राहायला जातील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आणखी वाचा – “ही तर खरी ढोंगी”, सोनाक्षी सिन्हाचा नवऱ्याबरोबरचा व्हिडीओ पाहून भडकले लोक, म्हणाले, “फक्त रडणं…”
रणबीर आणि आलिया यांनी त्यांच्या या बंगल्याची नोंदणी मुलगी राहाच्या नावावर केली आहे. रणबीर आलियाचा बंगला नसून बहुमजली इमारतच आहे जी एखाद्या महालापेक्षा कमी नाही. नवीन घर तयार झाल्यानंतर रणबीर आणि आलिया त्यांची मुलगी राहाबरोबर तिथे राहायला जाऊ शकतात. सध्या रणबीर व आलियाच्या या आलिशान बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.