Raj Kapoor 100th Birth Anniversary : काल दिग्गज अभिनेते राज कपूर यांची १०० वी जयंती होती. संपूर्ण कपूर कुटुंबीयांनी यावेळी एका भव्य सेलिब्रेशनचे आयोजन केले होते ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. दिवंगत अभिनेते राज कपूर यांची १०० वी जयंती कपूर कुटुंबाने मोठ्या थाटामाटात साजरी केली. रेखा, विकी कौशलपासून जेनेलिया आणि शर्वरी वाघपर्यंत अनेक कलाकार मंडळी सहभागी झाले होते. काळ्या रंगाची साडी परिधान करुन जेनेलिया देशमुख खूपच क्लासी दिसत होती. काळ्या नेकलेस आणि स्मोकी डोळ्यांनी तिने तिचा लूक पूर्ण केला होता. ब्लॅक अँड व्हाइट ब्लेझरमध्ये रितेश देशमुखही खूप छान दिसत होता. राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त श्वेता बच्चननेही हजेरी लावली होती. यावेळी तिच्याबरोबर त्यांचा मुलगा अगत्स्य नंदाही दिसला.
या कार्यक्रमाला रेखाही गोल्डन सिल्क साडीमध्ये सुंदर दिसत होती. यादरम्यान ती आलिया भट्टबरोबर पोज देताना दिसली. या सेलिब्रेशनमध्ये हुमा कुरेशीही काळ्या रंगाच्या साडीत दिसली. डायमंड नेकलेस आणि मॅचिंग बॅग घेऊन अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. यावेळी विकी कौशल ऑल ब्लॅक लूक कॅरी करताना दिसला. त्याने ब्राऊन शूज घालून तिचा लूक पूर्ण केला. शर्वरी वाघचा लूकही एकदम साधा आणि क्यूट होता. तिने तपकिरी रंगाचा ब्लेझर आणि काळ्या रंगाची पँट घातलेली दिसली.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारूला दुसऱ्या मुलाबरोबर पाहून आदित्यचा जळफळाट, प्रेमात पडल्याची जाणीव होणार का?
कार्तिक आर्यनही ऑल ब्लॅक लूकमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता. काळ्या ब्लेझरच्या आतील मॅचिंग हायनेक त्याच्या ड्रेसिंगमध्ये भर घालत होता. राखाडी रंगाचा ओव्हरकोट घातलेला विजय वर्माही खूप हँडसम दिसत होता. त्याने तपकिरी रंगाची सैल पँट घातली होती. राज कपूर यांच्या 100व्या जयंतीनिमित्त फरहान अख्तरही पत्नी शिबानीबरोबर आला होता. शिबानी ग्रे कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. राखाडी शर्टसह काळा ब्लेझर परिधान केलेला आदित्य रॉय कपूरही या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला होता.
राज कपूर यांच्या १०० वी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरी पोहोचलं होतं. करीना कपूर व नीतू कपूर यांनी पंतप्रधानांबरोबरच्या भेटीचे फोटो शेअर केले होते. यावेळी करिश्मा कपूर, सैफ अली खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, रिद्धिमा कपूर, आदर जैन, अरमान जैन, नीतू सिंग आणि रीमा जैन यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यही दिसले. सर्वांनी पीएम मोदींबरोबर पोज देत फोटो काढले, त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.