गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एक आई म्हणून देवोलिना भट्टाचार्जीचा संताप अनावर, लेकाच्या रंगावरुन ट्रोल करणाऱ्यांवर पुन्हा भडकली, म्हणाली, “कट्टर सनातनी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 25, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Devoleena Bhattacharjee trolling

एक आई म्हणून देवोलिना भट्टाचार्जीचा संताप अनावर, लेकाच्या रंगावरुन ट्रोल करणाऱ्यांवर पुन्हा भडकली, म्हणाली, "कट्टर सनातनी…"

Devoleena Bhattacharjee trolling : ‘साथ निभाना साथिया’ मधील गोपी बहूच्या भूमिकेमुळे प्रसिद्धीस आलेल्या टेलिव्हिजन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी हिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बराच सामना करावा लागला. अभिनेत्रीने जेव्हापासून तिच्या लेकाला जन्म दिला तेव्हापासून ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे. आई झाल्यानंतर देवोलिनाला सोशल मीडियावर वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. कारण तिच्या लेकाचा असणारा सावळा रंग. देवोलिनाच्या लेकाच्या सावळ्या रंगावरुन त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं. यावेळी एक आई म्हणून देवोलिना कायम खंबीर राहिली. आणि तिने वेळोवेळी ट्रोलर्सची कानउघडणी केली.

देवोलिनाने जन्माष्टमीनिमित्त तिच्या लेकाला कृष्ण बनवलं होतं. पिवळा कुर्ता-पायजमा परिधान केलेल्या मुलाचे काही सुंदर असे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या पोस्टवर बहुतेक चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं, तर काही नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून वर्णद्वेषी टिप्पणीसह मर्यादा ओलांडली. आणि यानंतर एका आईतील दुर्गा जागी झाली. आणि तिने गप्प न राहण्याचा निर्णय घेतला. या टिप्पणीकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तिने ट्रोल केलेल्यांचे थेट स्क्रीनशॉट शेअर केले आणि त्यांची ओळख सांगितली.

आणखी वाचा – संकर्षण कऱ्हाडेच्या ‘तू म्हणशील तसं’ नाटकाचा शेवट, निरोप घेताच अभिनेता भावुक, म्हणाला, “तुमच्या मनांत…”

View this post on Instagram

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने याबाबतची निराशा व्यक्त केली आणि लिहिले, “क्लासिक उदाहरणे मुलांसारखी का बनविली जातात आणि त्यांच्यासारखे का बनतात. जे घरी शिकतील, ते मोठे होतील आणि तेच करतील. दिवस आणि रात्र रामच्या नावाचा जप करुन कोणीही धार्मिक बनत नाही. रावणसुद्धा शिवचा भक्त होता”. ती पुढे म्हणाली, “देवाचे हे सर्व भक्त आणि कट्टर सनातनी स्वत: ला सांगतात आणि आमच्या हालचालींकडे पाहतात. मॅडम, आपण आपल्या मुलालाही कान्हा बनविले होते. कन्हैयाच्या रंगाशी इतकी नफरत आहे का?. तुमचा जन्म भारतात नाहीतर ब्रिटनमध्ये व्हायला हवा होता. ब्रिटिशांना काळ्या रंगाची समस्या होती”.

आणखी वाचा – परिणीती चोप्रा व राघव चड्ढा आई-बाबा होणार, लग्नाच्या दोन वर्षानंतर गुडन्यूज, शेअर केली खास पोस्ट

अभिनेत्रीच्या या प्रतिक्रियेला चाहत्यांकडून आणि अनुयायांकडून पाठिंबा मिळाला, ज्यांपैकी बर्‍याच जणांनी ऑनलाइन द्वेषाविरुद्ध कठोर भूमिका घेतल्याबद्दल तिचे कौतुक केले. बर्‍याच नेटकऱ्यांनी असेही म्हटले आहे की मुलांना लक्ष्य करणे चुकीचे आहे आणि अशा वर्तनाचा समाजावर वाईट परिणाम होतो. गेल्या वर्षाच्या सुरुवातीस, देवोलिना भट्टाचार्जी आणि तिचा नवरा शहनवाज शेख यांनी त्यांच्या मुलाचे आनंदाने स्वागत केले. तेव्हापासून, अभिनेत्री तिच्या आई झाल्यानंतरच्या प्रवासाचा आनंद लुटत आहे आणि बर्‍याचदा ती आपल्या मुलासह फोटो पोस्ट करत असते.

Tags: Devoleena BhattacharjeeDevoleena Bhattacharjee trolltelevision actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Last Stop Khanda New Movie

प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट उलगडणार 'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपटातून, श्रमेश बेटकर दिसणार मुख्य भूमिकेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.