रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बोल्ड भूमिका दिली, कपडे काढायला सांगितले अन् …; सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची ऑडिशनच्या नावाखाली मोठी फसवणूक, म्हणाली, “५० वर्षांचा माणूस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 24, 2025 | 5:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bollywood auditions scam

बोल्ड भूमिका दिली, कपडे काढायला सांगितले अन् …; सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची ऑडिशनच्या नावाखाली मोठी फसवणूक, म्हणाली, "५० वर्षांचा माणूस…"

bollywood auditions scam : सिनेसृष्टी म्हटलं की ट्रोलिंग हे आलंच. शिवाय अनेक कलाकार मंडळी आहेत ज्यांना सिनेविश्वात कास्टिंग काऊचची शिकारही व्हावं लागलं आहे. अनेक नवोदित कलाकार मंडळी आहेत ज्यांना सिनेसृष्टीत वाईट प्रसंगाचा सामना करावा लागला आहे. बॉलिवूडची झगमगती दुनिया असली तरी यामागची दुनिया नेमकी कशी आहे याचा बऱ्यापैकी अनुभव या कलाकार मंडळींना आला असावा. बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर कास्टिंग काऊचचा त्यांचा अनुभव चाहत्यांसह शेअर केला आहे. तर काहींनी हा अनुभव न सांगणं प्रिफर केलं आहे. अशातच बॉलिवूडमधील विनोदी नट जॉनी लिव्हर यांच्या मुलीलाही म्हणजे अभिनेत्री जिमी लिव्हरलाही असाच काहीसा वाईट अनुभव ऑडिशन दरम्यान आला असल्याचं तिने दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

जिमीने झूमला दिलेल्या मुलाखतीत हा वाईट अनुभव शेअर केला. आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या ऑडिशनच्या नावाखाली तिला कपडे काढण्यास सांगितले. वेळीच सावधनात बाळगत जिमीने स्वतःची सुखरूप सुटका केली. ऑडिशन व्हिडीओ कॉलवर होईल असे दिग्दर्शकाकडून तिला सांगण्यात आले होते. जिमी म्हणाली, “ऑडिशन ऑनलाईन असल्याचं सांगितलं पण संहिता स्क्रिप्ट शेअर केली जाणार नाही असंही सांगितलं. मग मला एक लिंक पाठवण्यात आली आणि मी तो कॉल जॉइन केला. पण, समोरच्या व्यक्तीचा व्हिडीओ सुरु नव्हता. “मी व्हिडीओ ऑन करु शकत नाही. पण तू या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट आहेस. काही गोष्टी टेस्ट करायच्या आहेत”, असं तो म्हणाला. त्यानंतर जिमी सांगते, “ही भूमिका बोल्ड आहे. त्यामुळे मी विचारलं की, मला नेमकं काय करायचं आहे, तेव्हा त्या व्यक्तीनं सांगितलं, “कल्पना कर की, तुझ्यासमोर ५० वर्षांचा माणूस बसला आहे आणि त्याला तुला आकर्षित करायचं आहे. नंतर त्यानं कपडे उतरवण्याचा सल्ला दिला. आणि शेवटी एक इंटिमेट सीन असल्याचंही सांगितलं”.

आणखी वाचा – ‘नवरी मिळे…’ फेम अभिनेत्रीने मुंबईत घेतलं स्वतःचं घर, भाड्याचे घर सोडताना ढसाढसा रडली, म्हणाली, “वाईट प्रसंगात…”

View this post on Instagram

A post shared by Jamie Lever (@its_jamielever)

जिमीला ही गोष्ट कुठेतरी खटकली. तिने लगेच सावधान होत विचारलं, “मी लगेच स्पष्ट केलं की, मला हे अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. मी स्क्रिप्ट असेल, तर त्यानुसार काम करते. त्यावर त्यांनी सांगितलं की, कोणतीही स्क्रिप्ट नाही. त्यामुळे तुला काही बोलायचं असेल किंवा दुसरं काही करायचं असेल, तर ते मोकळ्या मनानं कर”. यासाठी अजिबात तयार नसल्याचं जिमीने म्हटलं. तरीही तो तिला पटवून देत म्हणाला, “हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, तुला यामध्ये कास्ट करायचं आहे”. मग मी स्पष्टपणे सांगितलं, “जर हेच अपेक्षित असेल, तर मी बोलायलासुद्धा तयार नाही” आणि मी लगेच व्हिडीओ कॉल बंद केला”.

आणखी वाचा – डॉक्टरांनी बरिणीभर गाठी काढल्या, गोळ्यांची एलर्जी आणि…; ‘पारू’ फेम अभिनेत्याच्या पत्नीचा कठीण काळ, कर्करोगाने त्रासल्या…

कॉल बंद करताच जिमीच्या लक्षात आलं की, ही एक मोठी फसवणूक असू शकते. त्याबद्दल ती म्हणाली, “जर मी यादरम्यान काही केलं असतं, तर त्यांनी त्याचा व्हिडीओ बनवून माझा मानसिक छळ केला असता. पण सुदैवानं मी माझं डोकं वापरलं आणि त्यातून वेळीच बाहेर पडले. पण यामुळे मला फार धक्का बसला होता. कारण मला याआधी असा अनुभव कधीच आला नव्हता. जॉनी लिव्हरची मुलगी आहे हे माहीत असूनही त्यांनी फसवायचा प्रयत्न केला”.

Tags: bollywood auditionsbollywood newscasting couchjohny lever daughter
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Johnny Lever SLAMS Modern Comedians

"आमच्या समोर टिकायची लायकी नाही", मॉडर्न कॉमेडीयन्सच्या अश्लील विनोदांवर जॉनी लिव्हर भडकले, म्हणाले, "खरी परीक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.