२०२५ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी नवीन घर, नवीन गाडी व नवीन व्यवसायाची सुरुवात केली. अशातच आता यात आणखी एक अभिनेत्याची भर पडली आहे. ती म्हणजे ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका फेम अक्षर कोठारी. अक्षर कोठारीने नुकतीच नवीन गाडी घेतली असून याची खास झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात अक्षरने एक नवी कोरी महागडी गाडी खरेदी केली आहे. ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षरने काळ्या रंगाची आलिशान कार खरेदी केली आहे. (Akshar Kothari bought new car)
अक्षरने शोरुमध्येच कारची पूजा केली आणि या नवीन गाडीच्या खरेदीची खास झलक एका व्हिडिओ मार्फत सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याच्या या नवीन गाडीनिमित्त अनेक कलाकारांनी अक्षरला शुभेच्छाही दिल्या आहेत. अक्षरन शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री तेजश्री प्रधानने कमेंट करत, “वेलकम टू द फॅमिली, जीप कंपास…गूड चॉइस” असं म्हटलं आहे. तर यशोमान आपटे, अपूर्वा नेमळेकर, ऋतुजा कुलकर्णी, आशुतोष गोखले, सुमित पुसावले, चेतन वडणेरे, किशोरी आंबिये यांसह अनेकांनी त्याला कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या स्टार प्रवाह वरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका चांगलीच गाजत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. या मालिकेतली प्रत्येक पात्र प्रेक्षकांची अगदी आवडती झाली आहेत. मालिकेतील अद्वैत चांदेकर ही भूमिका साकारणारा अभिनेता अक्षर कोठारी हादेखील प्रेक्षकांचा लाडका झाला आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा अक्षर आता त्याच्या नवीन गाडीनिमित्त पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे.
अक्षरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो सध्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेत अद्वैत चांदेकर भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वी त्याने स्टार प्रवाह वरीलच ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या मालिकेआधी त्याने ‘छोटी मालकीण’, ‘कमला’, ‘चाहूल’ यांसारख्या मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे.