Abhishek Bachchan Video Viral : अभिषेक बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेला पाहायला मिळाला आहे. बरेचदा अभिनेता नेटकऱ्यांच्या तावडीत सापडला आहे. अशातच अभिनेता एका व्हिडीओमुळे चर्चेत आलेला पाहायला मिळाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चन कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे. यावेळी लोकांच्या नजरा त्याच्या दोन्ही हातांवर पडल्या. खरंतर अभिषेकने यावेळी दोन्ही हातांवर घड्याळ घातले आहे. आता त्याची स्टाईल पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. अभिषेक बच्चनच्या या स्टाइलवर लोक कमेंट करताना थकत नाहीत. त्याने आपल्या दोन्ही हातांवर घड्याळ का घातले आहे असा प्रश्न लोकांना पडला आहे. या प्रश्नाला काही लोक आपापल्या विचारशैलीने उत्तर देतानाही दिसत आहेत.
एका नेटकाऱ्याने अभिषेकचा हा व्हिडीओ पाहून असं म्हटलं की, “एक आईने दिले असावे आणि एक पत्नीने दिले असावे”. तर आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, “दोन घड्याळे? असे दिसते की त्याला जास्त काम मिळालं आहे”. तर आणखी एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “दोन घड्याळ पण वेळ अजूनही खराब आहे”. अशाप्रकारे नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत अभिषेकच्या हातातील दोन घड्याळे पाहून प्रश्न उपस्थित केले आहेत.
आणखी वाचा – देशमुखांच्या कुटुंबियांचा विचार तुम्ही तरी केला का?
अलीकडेच ट्विटरवर एका वेबसाइटने लिहिले आहे की, अभिषेक बच्चन अनावश्यकपणे नेपोटिझम नकारात्मकतेचा बळी ठरत आहे. त्याला ट्रोल करण्याऐवजी त्याचे काम पाहा ज्यात त्याच्या चित्रपटांची संख्या खूप जास्त आहे. ही पोस्ट पुन्हा ट्विट करत असताना, अमिताभ बच्चन म्हणाले, “मलाही असे वाटते आणि फक्त मी त्याचा पिता आहे म्हणून नाही”.
आणखी वाचा – गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीची रेड कार्पेटवर एन्ट्री, ग्लॅमरस लूक व्हायरल
त्याच वेळी, अभिषेक बच्चन यांनी आपल्या मुलाखतीत याबद्दल उघडपणे भाष्य केले. तो म्हणाला होता, “सत्य हे आहे की त्यांनी (अमिताभ) मला कधीही मदत केली नाही. हा एक व्यवसाय आहे हे लोकांना समजले पाहिजे. पहिल्या चित्रपटानंतर, जर त्यांना तुमच्यात काही दिसत नसेल किंवा चित्रपट क्रमांक मिळत नसेल तर तुम्हाला पुढची नोकरी मिळणार नाही. हे जीवनाचे कडू सत्य आहे”.