monika dabade In Star Pravah Award : ‘स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा २०२५’ ची सर्वत्र चर्चा सुरु आहे. कारण यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याचे रेड कार्पेटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावेळी स्टार प्रवाहच्या कलाकारांचे खास लूकही साऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसले. थीमनुसार मालिकेतील कलाकारांनी ड्रेसिंग केलेलं पहायला मिळालं. तर यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात एका अभिनेत्रीच्या एन्ट्रीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे ठरलं तर मग फेम अस्मिता म्हणजेच मोनिका दाभाडे. मोनिकाने घेतलेली ही एंट्री तिची एकटीच नव्हती. यावेळी रेड कार्पेटवर मोनिका तिच्या पतीसह आणि होणाऱ्या बाळासह उपस्थित होती. मोनिका लवकरच आई होणार आहे आणि गरोदरपणाच्या आठव्या महिन्यात तिने रेड कार्पेटला उपस्थिती लावली.
‘ठरलं तर मग’ ही मालिका मराठी टेलिव्हिजन विश्वातील नंबर १ मालिका आहे. ‘ठरलं तर मग’मध्ये जुई गडकरी व अमित भानुशाली मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान मालिकेतील सायली-अर्जुन या पात्रांवर प्रेक्षकांनी विशेष प्रेम केलंच आहे, मात्र यामध्ये असणाऱ्या नकारात्मक पात्रांनीही प्रेक्षकांचे मन जिंकले. यामध्ये असेच एक नकारात्मक बाजू असणारे पात्र म्हणजे ‘अस्मिता’. हे पात्र मोनिका दाभाडे साकारताना दिसली. नेहमीच सायली विरोधात जाऊन कट कारस्थान करण्याचा अस्मिताचा प्रयत्न मालिकेत पाहायला मिळालाय.
आता गरोदरपणामुळे मोनिकाने मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मोनिकाला आठवा महिना सुरु असून ती लवकरच गोंडस अशा बाळाला जन्म देणार आहे. स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावताना मोनिकाच्या चेहऱ्यावर गरोदरपणामुळे ग्लो आलेला पाहायला मिळाला. आणि प्रचंड खुशही दिसत होती. ही आठवण कायम आठवणीत राहिल असं मोनिका इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. मोनिका म्हणाली, “२०२५ चा स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा आहे तो तुझ्या बाबांनी लिहिलेला आहे. आणि ज्यात तू पण दिसलेलास/दिसलेलीस. आपल्यासाठी हे वर्ष हा पुरस्कार सोहळा स्पेशल आहे कारण आपलं हे पहिलं रेड कार्पेट आहे आणि तुझं पहिलं रेड कार्पेट होतं. आणि या आठवणी कायम आपल्याकडे राहतील. याचे फोटो कायम माझ्याजवळ असतील आणि आपणा तिघांनाही हा सोहळा लक्षात राहिलं”.
आणखी वाचा – अरमान मलिकच्या दोन वर्षीय मुलाला गंभीर आजार, बायकोचे रडून हाल, परिस्थिती अशी की…
‘ठरलं तर मग’ या मालिकेतील कलाकारांनीच काही दिवसांपूर्वी तिचं डोहाळे जेवण साजरे केले. या खास कार्यक्रमासाठी ‘ठरलं तर मग’मधील सर्व महिला कलाकार उपस्थित होत्या, मोनिकासाठी त्यांनी खास डान्सही केला.