मराठी कलाविश्वात सध्या सर्वत्र लग्नसराई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत, काही दिवसांपूर्वी रेश्मा शिंदे, किरण गायकवाड आणि शाल्व किंजवडेकर या कलाकारांनी आपल्या जोडीदराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता लवकरच एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे आई कुठे काय करते मालिकेतील आरोही, अर्थात अभिनेत्री कौमुदी वलोकर. कौमुदीच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे आणि तिच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवातही झाली आहे. याची खास झलक तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. (Kaumudi Valokar mehndi ceremony)
नुकतंच तिचं ग्रहमख पार पडलं. त्यानंतर आता तिच्या हातावर होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी रंगली आहे. कौमुदीच्या मेहंदी सोहळ्याला आता सुरुवात झाली असून, याची लहानशी झलक अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने हाताला मेहंदी लागल्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकसे असं आहे. त्यामुळे आता लवकरच हे दोघे विवाहबंधनात अकडणार आहेत.
आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला विवाहबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
नुकतंच या मालिकेतील कलाकारांनी तिचं केळवण साजरं केलं होतं. मालिका संपल्यानंतर लग्नाआधी ‘आई कुठे काय करते’मधील कलाकारांनी तिच्या केळवणाचा थाट केला होता. अभिषेक देशमुख आणि त्याची पत्नी कृतिका देव, अश्विनी महांगडे व सुमित ठाकरे या कलाकारांनी कौमुदीचं केळवणं केलं होतं. याचे फोटो शेअर करत कौमुदीने खास पोस्टही लिहिली होती. त्यानंतर आता तिच्या हाताला मेहंदी लागली आहे.
आणखी वाचा – अखेर अर्जुनने दिली प्रेमाची कबुली, एसटी स्टँडवर जाहीर घोषणा केली अन्…; प्रोमो व्हायरल
दरम्यान, कौमुदीने गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. आता ती लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश असं आहे. कौमुदी आकाशबरोबर लवकरच सात फेरे घेत संसार थाटणार आहे. अद्याप तिच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही. पण तिच्या लग्नाची अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. तिचे चाहते मंडळी या लग्नाची वाट बघत आहेत.