Rakhi Sawant Net Worth : अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपट, गाण्यांमधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. अभिनयाबरोबरच ती तिच्या वक्तव्यांमुळेही नेहमी चर्चेत असते. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील होते. राखी सावंतला बॉलिवूडची ड्रामा क्वीन असे देखील म्हटले जाते. जी कधी तिच्या लग्नामुळे तर कधी तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. विशेषतः अभिनेत्री नेहमीच तिच्या बोल्ड व बिनधास्त लूकमुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली आहे. नेहमीच चर्चत असणाऱ्या या राखीकडे अफाट संपत्ती आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. मुंबईत राखीचं वास्तव्य असून दुबईतही तिने बऱ्यापैकी संपत्ती जमवली आहे.
राखी सावंतने वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. त्यावेळी राखीला फक्त ५० रुपये पगार मिळत असे. परंतु अभिनेत्रीने कधीही हार मानली नाही आणि अनेक वर्षे कठोर संघर्ष केला. त्यानंतर फराह खानच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटात तिला एक पात्र साकारण्याची संधी मिळाली. चित्रपटातील अभिनेत्रीच्या या भूमिकेलाही खूप पसंती मिळाली होती. मात्र, हा चित्रपट राखीला अभिनयात यशस्वी करु शकला नाही.
आणखी वाचा – प्राजक्ता माळी श्री श्री रविशंकर यांच्या चरणी, आश्रममध्ये केला नवा कोर्स, म्हणाली, “कलावंत नसते तर…”
यानंतर राखीने डान्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. राखीने अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग केले. तिची ही गाणी ब्लॉकबस्टर हिट देखील ठरली. एक काळ असा होता की, राखीला बी-टाऊनची टॉप आयटम गर्ल म्हटले जायचे. सगळ्यांनाच तिच्या चालीचं वेड होतं. पण आता राखीने बरेच दिवस कोणतेही आयटम साँगही केलेले नाही. तसेच ती कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेत दिसली नाही, मात्र त्यानंतरही राखीच्या लक्झरी लाइफमध्ये कोणतीही घट झालेली नाही.
वास्तविक, चित्रपटांव्यतिरिक्त राखी सावंत जाहिरात शूट, ब्रँड प्रमोशन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही भरपूर पैसे कमावते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर राखी सावंतने आज ३७ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती स्वतःच्या बळावर मिळवली आहे. मुंबई व दुबईमध्ये आलिशान घरांशिवाय राखी सावंत अनेक आलिशान वाहनांची मालकीण आहे.