शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मजामस्करीत असं म्हटलं…”, वरण-भात गरिबांचं जेवण म्हणताच ट्रोल झालेल्या विवेक अग्निहोत्रीचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कोणत्याच वादात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 22, 2025 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bollywood director vivek agnihotri

"मजामस्करीत असं म्हटलं...", वरण-भात गरिबांचं जेवण म्हणताच ट्रोल झालेल्या विवेक अग्निहोत्रीचं स्पष्टीकरण, म्हणाले, "कोणत्याच वादात..."

bollywood director vivek agnihotri : काही दिवसांपासून बॉलिवूडचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री एका विशेष कारणाने चर्चेत आले आहेत. यापूर्वीही ते अनेकदा वादग्रस्त गोष्टींमध्ये अडकलेले पाहायला मिळाले. नेटकऱ्यांनी तर त्यांना अनेक मुद्द्यांवरुन ट्रोलही केलं. अशातच आता विवेक पुन्हा एकदा मराठी जेवणाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेले पाहायला मिळाले. मराठमोळ्या जेवणाला गरिबांचे जेवण म्हटल्याने त्यांच्यवर बरीच टीका झाली. या वादात ते इतके अडकले की मराठमोळ्या कलाकारांनीही विवेक यांना खडेबोल सुनावले. हे प्रकरण चांगलंच तापल्यानंतर आता विवेक यांनी स्वतःची बाजू मांडली आहे. त्या मुलाखतीदरम्यान विवेक यांनी केलेलं भाष्य हे गमतीत म्हटलं असल्याचं त्यांनी कबूल केलं.

नुकत्याच एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी मी तेव्हा ते मजामस्करीत बोलल्याचं सांगितलं. Curly Tales बरोबरच्या संवादात विवेक अग्निहोत्रींना पल्लवी जोशींनी कोणते मराठी खाद्यपदार्थ खायला सांगितले होते, असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणालेले, “मी दिल्लीचा असल्याने मला झणझणीत आणि मसालेदार जेवणाची सवय होती. लग्नानंतर पल्लवीनं मला वरण-भात खा, असं म्हटले होते. पण त्या वरणामध्ये मीठसुद्धा नसतं. तेव्हा मला सुरुवातीला वाटायचं की, हे काय गरिबांचं जेवण आहे”. त्यानंतर विवेक अग्निहोत्रींवर सोशल मीडियाद्वारे बरीच टीका करण्यात आली. मराठी इंडस्ट्रीमधील नेहा शितोळे आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीसुद्धा त्यांच्यावर परखड शब्दांत टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या गदारोळावर आता विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा – अश्लील मॅसेज केले, हॉटेलवर बोलावले आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे राजकीय नेत्याबाबत गंभीर आरोप, म्हणाली, “तक्रार करुनही…”

View this post on Instagram

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

The Raunac Podcast ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “आमच्याकडे Currly Tales ची मुलगी पॉडकास्ट करण्यासाठी आली होती, तेव्हा गप्पा मारताना दिल्लीहून मुंबईला गेलो, तेव्हा पल्लवी जोशीने मला वरण-भात खायला दिलं आणि तेव्हा मी मजामस्करीत असं म्हटलं की, त्यांच्या जेवणात मीठही नसतं. हे काय गरीब लोकांचं जेवण आहे वगैरे वगैरे… पण त्यानंतर मी हेही म्हटलं होतं की, मोठं झाल्यावर अक्कल आल्यानंतर मला कळलं की, भारतात सगळ्यात जास्त आरोग्यदायी जेवण हे महाराष्ट्रीयन जेवण आहे”.

आणखी वाचा – “नोरा फतेहीसारखी फिगर हवी”, नवऱ्याच्या मागणीने पत्नी त्रस्त, दिवस-रात्र जिमला पाठवायचा, उपाशी ठेवायचा आणि…

पुढे त्यांनी सांगितलं, “वरणभात हे माझं आवडीचं जेवण आहे आणि ते मी आता रोजच खातो. पण काही लोकांनी माझं सुरुवातीचं वाक्य एडिट केलं आणि मी महाराष्ट्रीयन जेवणाला गरीब जेवण म्हटल्याबद्दल माझ्यावर टीका केली. काही लोक वाक्य एडिट करुन चुकीच्या पद्धतीनं पसरवतात. मला आता कोणत्या वादात अडकायचं नाही”.

Tags: Bollywood directorentertainmentvivek agnihotri
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bobby Darling Interview

"माझ्यावर घाणरेडे विनोद करुन प्रसिद्धी मिळवली", अभिनेत्रीचा कपिल शर्माला टोला, म्हणाली, "त्याचं वाईट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.