रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ब्राम्हणांवर मूत्रविर्सजन करेन” म्हणणाऱ्या अनुराग कश्यपची हात जोडून माफी, म्हणाला, “मर्यादा ओलांडून…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 22, 2025 | 1:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
anurag kashyap apology to brahmin community

ब्राम्हण समाजाबाबत बोलल्यानंतर अनुराग कश्यपची माफी, पोस्ट व्हायरल

Anurag Kashyap Controversy : ‘फुले’ चित्रपटाचा वाद झपाट्याने वाढत असताना नवं प्रकरण समोर आलं. सेन्सॉर बोर्डाने ‘फुले’मधील काही सीन्स वगळण्याचे आदेश दिले. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण लांबणीवर गेलं. हा वाद पेटला असताना दिग्दर्शक अनुराग कश्यपने यामध्ये उडी घेतली. मात्र चित्रपटाचा वाद कमी होत अनुरागलाच सगळ्यांना टार्गेट केलं. यामागचं कारणंही तसंच होतं. ‘फुले’ विषयी बोलताना अनुरागने ब्राम्हण समाजावर भाष्य केलं. तसेच आक्षेपार्ह टिपणी केली. आता हा वाद आणखीनच पेटला आहे. ब्राम्हण समाज संतापला असताना त्याने जगजाहिर माफी मागितली आहे. अनुरागने त्याच्या वक्तव्यावर युटर्न घेतला आहे. (Anurag Kashyap Apology To Brahmin Community )

अनुराग कश्यप काय म्हणाला?

अनुराने इनस्टाग्राम अकाऊंटद्वारे स्टोरी शेअर करत माफी मागितली. तो म्हणाला, “रागात मी समोरच्या व्यक्तीला उत्तर देताना माझी मर्यादा विसरलो. संपूर्ण ब्राम्हण समाजालाच मी वाईट बोललो. त्या समाजातील लोक अजूनही माझ्या आयुष्यातल आहेत. माझ्या आयुष्यात त्यांचं योगदान मोठं आहे. आज ते सगळे माझ्यामुळे दुखावले आहेत. मी रागात ज्या पद्धतीने बोललो त्यामुळे ते दुखावले. पण मी सगळ्यांचा आदर करतो. बोलताना माझा मुद्दाच भरकटत गेला”.

आणखी वाचा – “ब्राम्हणांवर मूत्रविर्सजन करेन” म्हणणारा अनुराग कश्यप नक्की कोणता धर्म फॉलो करतो?, खरं आडनाव काढूनच टाकलं कारण…

पुढे तो म्हणाला, “मी मनापासून माफी मागतो. मला असं काही बोलायचं नव्हतं. पण एका व्यक्तीच्या विचित्र कमेंटला उत्तर देताना मी काहीही बोलून बसलो. त्यासाठी मी खरंच माफी मागतो. संपूर्ण समाज, मित्र-मंडळी, माझे कुटुंब यांचीही माफी मागतो. यापुढे असं काही घडणार नाही. यावर मी आता काम करेन. माझ्या रागावरही मी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेन. मुद्द्याचं बोलायचं जरी असेल तरी मी योग्य त्याच भाषेमध्ये बोलेन. तुम्ही मला समजून माफ कराल अशी आशा आहे”.

View this post on Instagram

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10)

आणखी वाचा – चुलत भावाबरोबर शारीरिक संबंध, घाणेरडं मासिक पाहून जे केलं…; सुप्रसिद्ध गायकाचे धक्कादायक खुलासे

नक्की प्रकरण काय?

अनुरागने ‘फुले’ चित्रपटाबाबत बोलताना एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर एकाने कमेंट केली. “ब्राम्हण तुमचा बाप आहे का?” अशी कमेंट होती. या कमेंटवर उत्तर देत अनुराग म्हणालेला, “ब्राम्हणांवर मी मुतणार, तुम्हाला काही त्रास?”. ही एक कमेंट सगळ्यांनी उचलून धरली. त्यानंतर अनुरागच्या लेकीलाही बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्या. त्याच्या कुटुंबालाही धमक्यांच्या स्वरुपात घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता माफी मागितल्यानंतर तरी हे प्रकरण थंडावणार का? हे पाहावं लागेल.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aditi sarangdhar in maitricha saatbara webseries

‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजमध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची धमाकेदार एन्ट्री, नव्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.