सध्या पंजाबी व बॉलिवूड गायक दिलजीत दोसांज खूप चर्चेत आहे. जगभरात दिलजीतचे अनेक कॉन्सर्ट आयोजित केले जातात. त्याच्या सर्व कॉन्सर्टला मोठ्या उत्साहाने चाहते हजेरी लावतात. त्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट ‘दिल-लुमिनाटी टूर’मुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या कॉन्सर्टचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामधून त्याच्यावरील चाहत्यांचे प्रेम स्पष्टपणे दिसते. अशातच नुकताच त्याच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला दिसून येत आहे. मात्र एका एका शो दरम्यान परफॉर्मन्स करताना तो तोंडावर पडल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (diljit dosanjh fell at stage)
दिलजीतने आजवर भारतात दिल्ली, जयपूर, लखनऊ व हैद्राबाद येथे परफॉर्म केले आहेत. १७ नोव्हेंबर रोजी त्यांना अहमदाबाद येथे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. त्याच्या परफॉर्मन्सला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले होते. हे बघून तो अधिक उत्साहात बघायला मिळाला. यावेळी तो मंचावरच खाली पडला. पण त्याने लगेचच स्वतःला सावरलं आणि उभा राहिला.
आणखी वाचा – ट्रेनमध्ये आरामात झोपून मलायका अरोराचा प्रवास, चेहरा पाहून ओळखणंही कठीण, फोटो व्हायरल
दिलजीत मंचावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एका चाहत्याने २०१३ सालचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळीदेखील दिलजीत मंचावर पडला होता आणि त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत लिहिले की, “जेव्हापण पडला दुप्पट प्रसिद्धी मिळाली आहे याला”, तसेच दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “१० वर्षात एकदा तरी पडणं व्हायलाच पाहिजे”.
जेव्हा दिलजीत अहमदाबाद येथील कॉन्सर्टदरम्यान मंचावर पडला तेव्हा त्यावेळी तो ‘पटियाला पेग’ गाणं म्हणत होता. तो स्टेजवर फिरून फिरून गाणं गात होता आणि त्याचवेळी तो पडला. मात्र लगेचच तो उठला आणि मागे गाणाऱ्या गायकांना त्याने थांबवलं आणि म्हणाला, “तुम्ही जे फायर करत आहात त्यामुळे तेल इथे सांडत आहे. असं नका करु”. त्यानंतर त्याने सगळ्यांना अभिवादन करत ठीक असल्याचेही सांगितले.