‘बिग बॉस मराठी’चे यंदाचे पाचवे पर्व अनेक् कारणांनी गाजलं. त्यापैकी एक मोठं कारण म्हणजे आर्या जाधव व निक्की तांबोळी यांच्यात झालेला राडा. बिग बॉसच्या घरात एका टास्कमध्ये आर्या व निक्की यांच्यात वाद झाला. या वादानंतर आर्याने निक्कीला शोमध्येच कानाखाली मारली होती. यामुळे या दोघींमधला वाद टोकाला जाऊन निक्कीने आर्याला ताबडतोब घराबाहेर काढण्याची विनंती ‘बिग बॉस’ला केली होती. यावर ‘कोणत्याही सदस्यावर हात उचलणं हे ‘बिग बॉस’ शोच्या महत्त्वाच्या नियमांचं उल्लंघन आहे’ असं सांगत बिग बॉसच्या टीमकडून तात्काळ व्हिडीओ क्लिप्स, फुटेज तपासून टीमने आर्याला घराबाहेरचा रस्ता दाखवला. (Aarya Jadhao and Nikki Tamboli Controversy)
यामुळे आर्या ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडली. आर्याच्या ‘बिग बॉस’च्या घरातील वागण्याचे काहींनी समर्थन केले, पण अनेकांनी तिचे कौतुकही केलं. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर येताच अनेकांनी आर्याच्या वागण्याचे समर्थन केले आणि या प्रेमामुळे आर्यासुद्धा भारावून गेली. वाइल्ड कार्ड म्हणून तिची एन्ट्री पुन्हा घरात व्हावी यासाठी अनेकांनी जोर लावला होता. पण, यंदाचा शो ७० दिवसांत संपला आणि मग या दोघींमधील वादाच्या चर्चाही संपल्या. हा वाद शांत झाला असं सर्वांनाच वाटत असताना नुकतंच या दोघींमध्ये वादाची ठिणगी पडली. आर्याने शेअर केलेल्या एका रॅपवर, “ही फुटेज खातेय” असा आरोप निक्कीच्या एका फॅनपेजने केला होता आणि हीच इन्स्टाग्राम स्टोरी निक्कीने रिशेअर करत त्यावर “एक मोटा हाथी…” हे गाणं लावलं होतं.
आणखी वाचा – अमोल गंभीर आजाराशी कसा करणार सामना?, अर्जुनने खूश करण्यासाठी दिलं खास गिफ्ट, त्यात अप्पीचाही फोटो अन्…
यावर आता आर्याने पुन्हा एकदा व्हिडीओ शेअर करत प्रतिउत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर आर्याच्या उत्तराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “मला इन्स्टाग्रामवर एका मुलीचा मॅसेज आला… त्यात असं लिहिलं होतं की, निक्कीची स्टोरी बघ. मी पाहिलं तेव्हा निक्कीने कोणाची तरी स्टोरी रिपोस्ट केली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की, आर्या अजूनही निक्कीच्या नावाने फुटेज खात आहे आणि निक्की मॅडमने त्या पोस्टला “एक मोटा हाथी…” असं गाणं लावलं होतं. निक्की तू चांगलं फॅट शेमिंग करतेस. मी पण एक रॅपर आहे. माझ्या लिखाणातून मी उत्तर देणार. तुम्हाला वाटतं ना मी गप्प राहावं मग मला उगाच भिडू नका”.
आणखी वाचा – Video : अलका कुबल, सई ताम्हणकरसह इतर मराठी कलाकारांच्या गौतमी पाटीलबरोबर रंगल्या गप्पा, चाहत्यांकडून कौतुक
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “रॅप लिहिणं हे माझं काम आहे. त्यामुळे मला जे वाटतं ते मी नक्कीच लिहिणार आणि त्यातून उत्तर देणार. जर मला तुझ्या नावाने फुटेज हवं असतं… तर, मी घरात राहून जिंकून आले असते. तुला मारुन घराच्या बाहेर नसते आले. तरीही लोक मला चांगलं बोलत आहेत. सगळे म्हणत होते अजून ४-५ पाच कानाखाली का नाही मारल्यास… मुलाखतींमध्ये ही मुलगी माझ्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी घाबरत होती. तिच मुलगी आता माझ्याबद्दल स्टोरीज टाकून फुटेज घेतेय… घे दिलं मी तुला फुटेज”.