बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा शुजित सरकार दिग्दर्शित ‘आय वॉन्ट टू टॉक’ हा चित्रपट शुक्रवार, २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: अभिषेकच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्या ब्लॉगवर ‘आय वॉन्ट टू टॉक’ चित्रपटाबद्दलचे त्यांचे विचार लिहिले आहेत. अमिताभ बच्चन यांना अभिषेकचा अभिनय खूप आवडला असून त्यांनी सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून चित्रपटाचे व अभिषेकचे कौतुक केले आहे. (Amitabh Bachchan Praised Son Abhishek Bachchan)
बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, “काही चित्रपट तुमचे मनोरंजन करण्यासाठी येतात. काही चित्रपट तुम्हाला चित्रपट करण्यासाठी आमंत्रित करतात. पण मला एवढेच सांगायचे आहे. ‘आय वॉन्ट टू टॉक’ सारखे चित्रपट तुम्हाला आणखी चित्रपट बनवण्यासाठी आमंत्रित करतात. हा चित्रपट तुम्हाला तुमच्या खुर्चीवरुन हळूवारपणे उचलतो, तितक्याच हळूवारपणे थिएटरमध्ये घेऊन जातो आणि मग तुम्हाला स्क्रीनच्या आत घेऊन जातो. तुम्ही त्याकडे पाहत आहात आणि त्यातून पळून जाण्याची इच्छा होत नाही”.
आणखी वाचा – यशने रेवतीला दिली प्रेमाची कबुली, एजेंसमोर सत्य येणार का?, लीलाचा पाठिंब कायम पण…
यापुढे अमिताभ यांनी असं म्हटलं आहे की, “अभिषेक… तू अभिषेक नाहीस… तू चित्रपटाचा अर्जुन सेन आहेस. पुढे अमिताभ यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या ओळींचा वापर करत असं म्हटलं की, “चांगल्यांनी मला चांगले ओळखले आणि ज्याला माझी गरज होती, त्यांनी मला त्यांच्याप्रमाणे ओळखले; ते काय म्हणतात ते त्यांना बोलू दे. पण मी हेच सांगतो. माझ्यातील चांगल्यासाठी लोभ असू शकतो. पण तुमची हावही वाईट असू शकते. चांगला विचार करणं किंवा वाईट विचार करणं ही तुमची ‘गरज’ होती आणि हीच माझी ओळख होती. मी तसा नव्हतो किंवा मला चांगलं समजणं इतकंच तू समजू शकतोस”.
आणखी वाचा – बजरंग जेलमध्ये नाही तर हॉस्पिटलमध्येच असल्याचे सत्य अक्षरा सर्वांसमोर आणणार, भुवनेश्वरीचाही खरा चेहरा समोर?
शेवटी त्यांनी लिहिले की, “तुम्ही एखाद्याला चांगले समजता, कारण असा विचार करण्याची तुमची गरज आहे. तुम्ही एखाद्याबद्दल वाईट विचार करता कारण तुमची गरज तुमच्यासाठी आहे. तुमची चांगली-वाईट गरज हा एक विचार होता, कारण तू माझ्या ओळखीची कदर केली. माझ्याबद्दल खोटे लिहिणे हे जीवनाचे शाश्वत सत्य होते. माझ्यातील चांगले दिसण्यासाठी मला तुझी गरज होती. तुम्ही मला किती ओळखलेस. ओळखले. नाही ओळखले”.