रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर थिरकल्या आशा भोसले, गायकाकडून कौतुक, म्हणाला, “त्या वयाच्या ९१ व्या वर्षी…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 30, 2024 | 12:16 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
asha bhosle on tauba tauba dance

आशा भोसले यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

भारतीय संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका म्हणजे आशा भोसले. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी आजवर खूप गाणी गायली आहेत. त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने सगळ्यांनाच मोहित केले आहे. सध्या त्या ९१ वर्षाच्या आहेत. मात्र इतके वय असूनदेखील त्यांच्यामधील उत्साह जराही कमी झालेला नाही. तितक्याच उत्साहात त्या आजही गाताना दिसतात. अशातच त्यांचा एक कॉन्सर्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी आशा यांनी असं काही केलं ज्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच त्यांचे कौतुकदेखील केले आहे. (asha bhosle on tauba tauba dance)

एका कार्यक्रमादरम्यान आशा या गाणे गात होत्या. यावेळी त्यांनी विकी कौशल व तृप्ती डीमरी यांच्या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणं गायलं. त्यांनी शास्त्रीय पद्धतीनेदेखील गाणं गायलं. त्यांचं हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याचा गायक करण औजलानेदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये आशा ‘तौबा तौबा’ गाणं गाताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी गाणं गात यावरील व्हायरल हुक स्टेपदेखील करताना दिसल्या आहेत. त्यांच्या या परफॉर्मन्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा – Video : …अन् चालू नाटकातच शरद पोंक्षे सर्वकाही विसरले, पुन्हा प्रेक्षकांसमोर येऊन रडू लागले आणि…; व्हिडीओ व्हायरल

करणने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “आशा भोसले संगीतातील एक देवी आहेत. ‘तौबा तौबा’ हे गाणं गायलं. ज्या मुलाने हे गाणं लिहिलं तो एका गावामध्ये मोठा झाला आहे. या मुलाची कोणतीही संगीताची पार्श्वभूमी नाही. संगीत वाद्यांचीदेखील कोणतीही जाण नाही”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध ‘अनुपमा’ मालिकेतील ‘तो’ सीन पाहून प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “ही तर बी ग्रेड वेबसीरिज…”

पुढे त्याने लिहीले की, “या गाण्याला सगळ्यांचीच खूप पसंती मिळाली आहे. पण हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हे मी कधीही विसरणार नाही. मी खूप धन्य आहे आणि आभारीदेखील आहे. यामुळे मी अधिक गाणी तयार करण्यासाठी प्रेरित झालो आहे”. तसेच करणने एका स्टोरीमध्ये लिहिले की, “मी हे वयाच्या २७ व्या वर्षी लिहिले. पण त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी खूप छान गायले आहे”. आशा यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

Tags: aasha bhosalehindi songtauba tauba
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Malayalam film and TV actor Dilip Shankar passed away and his dead body found in the hotel room

मल्याळम अभिनेते दिलीप शंकर यांचा संशयास्पद मृत्यू, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.