भारतीय संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका म्हणजे आशा भोसले. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी आजवर खूप गाणी गायली आहेत. त्यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने सगळ्यांनाच मोहित केले आहे. सध्या त्या ९१ वर्षाच्या आहेत. मात्र इतके वय असूनदेखील त्यांच्यामधील उत्साह जराही कमी झालेला नाही. तितक्याच उत्साहात त्या आजही गाताना दिसतात. अशातच त्यांचा एक कॉन्सर्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी आशा यांनी असं काही केलं ज्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच त्यांचे कौतुकदेखील केले आहे. (asha bhosle on tauba tauba dance)
एका कार्यक्रमादरम्यान आशा या गाणे गात होत्या. यावेळी त्यांनी विकी कौशल व तृप्ती डीमरी यांच्या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणं गायलं. त्यांनी शास्त्रीय पद्धतीनेदेखील गाणं गायलं. त्यांचं हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्याचा गायक करण औजलानेदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये आशा ‘तौबा तौबा’ गाणं गाताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी गाणं गात यावरील व्हायरल हुक स्टेपदेखील करताना दिसल्या आहेत. त्यांच्या या परफॉर्मन्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2024/12/image-44.png)
करणने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “आशा भोसले संगीतातील एक देवी आहेत. ‘तौबा तौबा’ हे गाणं गायलं. ज्या मुलाने हे गाणं लिहिलं तो एका गावामध्ये मोठा झाला आहे. या मुलाची कोणतीही संगीताची पार्श्वभूमी नाही. संगीत वाद्यांचीदेखील कोणतीही जाण नाही”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध ‘अनुपमा’ मालिकेतील ‘तो’ सीन पाहून प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “ही तर बी ग्रेड वेबसीरिज…”
पुढे त्याने लिहीले की, “या गाण्याला सगळ्यांचीच खूप पसंती मिळाली आहे. पण हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि हे मी कधीही विसरणार नाही. मी खूप धन्य आहे आणि आभारीदेखील आहे. यामुळे मी अधिक गाणी तयार करण्यासाठी प्रेरित झालो आहे”. तसेच करणने एका स्टोरीमध्ये लिहिले की, “मी हे वयाच्या २७ व्या वर्षी लिहिले. पण त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी खूप छान गायले आहे”. आशा यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.