शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२१व्या वर्षी लग्न, दोन वर्षामध्ये घटस्फोट अन्…; चार वर्ष अफेअर असूनही अदिती राव हैदरला लाभलं नाही वैवाहिक सुख, म्हणाली, “लग्नाच्या…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 27, 2023 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Aditi rao hydari divorced after two years of marriage

Aditi rao hydari divorced after two years of marriage

बॉलिवूड व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयातून स्वतःची वेगली अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदिती राव हैदरी. अदितीने २००६ मध्ये मल्याळम चित्रपटात ‘प्रजापती’ चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तिने हिंदीत चित्रपट ‘दिल्ली ६’ मधून सुरुवात केली. पण अदिती चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिली आहे. मग त्यात राजघराण्याचा विषय असो किंवा लग्न, घटस्फोट असो.अदिती तिच्या खऱ्या आयुष्यात एक राजकुमारी आहे, याबाबत सगळ्यांनाच माहिती आहे. अदिती ही अकबर हैदरी यांची नात व आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. अदितीच्या आईचा व वडिलांचा प्रेमविवाह झाला होता. पण तो फार काळ टिकला नाही. ती दोन वर्षांची होती जेव्हा तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आदिती तिच्या आईबरोबर राहू लागली. (Aditi rao hydari divorced after two years of marriage)

अदिती अवघ्या १७ वर्षांची असताना ती अभिनेता सत्यदीप मिश्राच्या प्रेमात पडली. चार वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनीही लग्न केलं. तेव्हा अभिनेत्री फक्त २१ वर्षांची होती. पण तिचं हे लग्न केवळ दोन वर्षे टिकलं त्यांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. याबाबत अदितीने बरीच वर्षे वक्तव्य केलं नव्हतं. २०१३ मध्ये तिने यावर भाष्य केलं. एका मुलाखतीदरम्यान अदितीने खुलासा केला होता की, लग्नाच्या दोन वर्षानंतर ते आता वेगळे झाले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

आणखी वाचा – “याचा पूर्णपणे दोष…”, सलग तीन फ्लॉप चित्रपटांवर रणवीर सिंहचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाला, “या काळात मी खूप…”

आता बऱ्याच वर्षानंतर अदितीच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. अदिती गेल्या दोन वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थला डेट करत आहे. दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट होतात. मात्र दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगलं आहे. या दोघांनी २०२१ मध्ये ‘महा समुद्रम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील दोघांची रोमँटिक केमिस्टी प्रेक्षकांना बरीच आवडली.

View this post on Instagram

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

आणखी वाचा – अमृता रावने सेटवर शिवीगाळ करताच ईशा देओलने तिच्या कानाखाली मारली अन्…; तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

अदितीने चित्रपटात तुलनेने खूप कमी काम केलं आहे. पण मात्र तिने ज्या चित्रपटात काम केलं त्या चित्रपटात तिच्या पात्राने वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचं ‘पद्मावत’ चित्रपटातील अलाउद्दीन खिलजीची पत्नी मेहरुनिसाची भूमिका असो किंवा ‘रॉकस्टार’ चित्रपटातील पत्रकार असो अदितीने या सगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

Tags: actor satyadeep Mishraaditi rao hydaribollywood actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Vidyadhar Joshi Birthday

अभिनेते विद्याधर जोशी अजूनही करत आहेत नोकरी, मोठ्या आजाराने होते त्रस्त, म्हणालेले, "दोन्ही फुफुस ८० ते ८५ टक्के निकामी झाले अन्…",

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.