Do Patti Movie : गेल्या काही दिवसांपासून क्रिती व काजोल यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘दो पत्ती’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. पोस्टर् प्रदर्शित झाल्यापासूनच याबद्दलच्या अनेक चर्चा पाहायला मिळत आहेत. अशातच या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी पोस्टर आणि टीझर रिलीज करण्यात आला होता, ज्यामुळे उत्कंठा वाढली होती आणि आता त्याचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमधली उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिलेल्या या चित्रपटात अनेक ट्विस्ट असल्याचे पाहायला मिळत आहे. (Do Patti Trailer)
या चित्रपटात क्रिती व काजोल यांच्याबरोबरच शाहीर शेख बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ट्रेलरची मुख्य झलक शाहीरच्या पात्र ध्रुव सूदची आहे, जिथे काजोल, पोलिसाची भूमिका करत आहे, एका खुनाच्या संदर्भात त्याची चौकशी करते. या सिनेमात क्रिती सेनॉनची दुहेरी भूमिका आहे, ज्यामध्ये शाहीर शेख नक्कीच अडकला आहे. काजोलही तिच्या डोक्याला मारताना दिसली.
क्रिती सेननने या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यात अभिनयही आहे. त्यांची दुहेरी भूमिका सीता-गीतासारखीच आहे. जिथे एक निष्पाप मुलगी तर दुसरी मानसिक अस्वस्थता. आणि त्यामुळे शाहीर शेख तुरुंगाच्या मागे जातो. ध्रुव त्यांच्यापैकी एकावर मानसिक अस्थिरतेचा आरोप करतो आणि हा आरोप कथेतील रहस्य आणि थरार वाढवतो. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे हा चित्रपट फक्त प्रेक्षक नेटफ्लिक्सवरच पाहू शकतात.
आणखी वाचा – बच्चन कुटुंबियांबरोबर राहतच नाही ऐश्वर्या राय, ‘त्या’ व्हिडीओनंतर भांडणाचं सत्य समोर, घडलं असं काही की…
दरम्यान, ‘दो पत्ती’ चित्रपट नेटफ्लिक्सवर येत्या २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण डोंगर दऱ्यांमध्ये करण्यात आले आहे. जो क्राईम-थ्रिलर प्रकारावर आधारित आहे. यात शाहीर आणि क्रिती व काजोल यांचा अभिनय पाहणे मनोरंजक असेल. ट्रेलर लॉन्चच्या वेळी काजोलने सांगितले की, तिने पोलिसाची भूमिका साकारण्यापूर्वी अजय देवगणकडून टिप्स घेतल्या होत्या. कारण ही तिची पहिली पोलीस भूमिका आहे.