रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

परदेशात नग्न पार्टीत पोहोचली सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, २० मिनिटांतच तिथून पळाली अन्…; म्हणाली, “कोणाचाही प्रायव्हेट पार्ट…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 16, 2024 | 6:26 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Suchitra Krishnamoorthi News

परदेशात नग्न पार्टीत पोहोचली सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, २० मिनिटांतच तिथून पळाली अन्…; म्हणाली, "कोणाचाही प्रायव्हेट पार्ट..."

अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती सध्या युरोपमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यावेळी तिने जर्मनीतील बर्लिन येथे ‘नेकेड पार्टी’ला हजेरी लावली. अभिनेत्रीने या पार्टीबद्दलचा तिला आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना तिने या पार्टीदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली की, “हा खूप वाईट अनुभव होता. मला बिलकुल मजा आली नाही”. ती म्हणाली, “या सगळ्या गोष्टी तिथे अगदी सामान्य आहेत. शरीराच्या सकारात्मकतेला प्रोत्साहन देणे हा त्या पार्टीचा मुद्दा आहे. या पार्टीला हजेरी लावत मला असे वाटले की हा एक अनुभव आहे त्याचा आस्वाद आपण घ्यायला हवा”. (Suchitra Krishnamoorthi News)

पुढे ती म्हणाली, “ही पार्टी एका बारमध्ये होत होती. जी एका मित्राच्या मित्राची होती. मी पाहुण्यांच्या यादीत होते. मी तिथे गेले आणि लगेच पळून आले कारण मी खूप संस्कारी आहे. मला कोणाचेही प्रायव्हेट पार्ट पाहण्यात रस नाही”. ती पुढे असेही म्हणाली की, “पण ही पार्टी तिथे चांगल्या हेतूने आयोजित केली आहे. हे सारं तिथे मजा व सकारात्मकतेसाठी केले जाते. ही पार्टी अजिबात अश्लील नव्हती. पण भारतीय असल्याने आपण आपल्या शरीराबाबत अधिक जागरुकता पसरवली आहे”.

आणखी वाचा – Video : सूनेच्या पाठवणी कार्यक्रमात मुकेश अंबानीच ढसाढसा रडू लागले अन्…; सगळ्यात भावुक क्षण समोर, साधेपणाने वेधलं लक्ष

Just attended a body positivity/ naked party in Berlin.

Reminded me of the quote : dont be so open minded that ur brains fall out.

Desi girl forever. Need a sĥower & some gayatri mantra chanting . Baapre ????

— Suchitra Krishnamoorthi (@suchitrak) July 13, 2024

अभिनेत्रीने त्या पार्टीत फक्त २० मिनिटे घालवली, तर ही पार्टी रात्रभर चालली. याचबरोबर तिने X वर याबद्दलही सांगितले. यांत तिने लिहिले की, “अलीकडे बर्लिनमध्ये शरीर सकारात्मकता/नग्न पार्टीत सहभागी झाले होते. मला एक गोष्ट आठवली की, इतके मोकळे होऊ नका की तुमचा मेंदू बाहेर पडेल. मी नेहमीच संस्कारी मुलगी राहिली आहे. स्नान करून गायत्री मंत्राचा जप करण्याची आवश्यकता आहे”.

आणखी वाचा – बांधलेले केस, विचित्र ड्रेस-मेकअप अन्…; ऐश्वर्या रायच्या फॅशनला झालंय काय?, अंबानींच्या कार्यक्रमात बघून सगळ्यांनाच धक्का बसला आणि…

याबाबत अभिनेत्रीने आपल्या मुलीलाही सांगितले नाही. अभिनेत्रीने सांगितले की तिची मुलगी कावेरीला माहित नाही की तिची आई अशा पार्टीला गेली आहे, परंतु तिला खात्री आहे की, जेव्हा ही गोष्ट तिच्या मुलीला कळेल तेव्हा ती जास्त विचार करणार नाही. सुचित्रा कृष्णमूर्ती म्हणाली, “जरी मी २० मिनिटांत पळून आले असले तरी मी त्या पार्टीला जाण्याचा प्रयत्न केला. मी असे काहीतरी केले याचा तिला आनंद होईल”.

Tags: bollywood gossipentertainmentSuchitra KrishnamoorthiSuchitra Krishnamoorthi News
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Mukesh Ambani spends 3 crore rupees a day, it will take 932 years and 6 months to destroy all his wealth know about his property

मुकेश अंबानींनी दिवसाला तीन कोटी खर्च केले तर त्यांची संपत्ती कधीपर्यंत संपणार?, तज्ज्ञांची माहिती ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का कारण...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.