झहीर इक्बाल व सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाची सिनेविश्वात चर्चा सुरु आहे. बरेच दिवसांपासून सुरु असलेल्या या चर्चेची उत्सुकता आता लवकरच संपणार आहे. सोनाक्षी व इक्बालच्या लग्नाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हे जोडपे २३ जून रोजी कुटुंबीय व मित्रमंडळींमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. या सगळ्या दरम्यान, पहिल्यांदाच शत्रुघ्न सिन्हा व पूनम सिन्हा यांना सोनाक्षी-झहीरबरोबर त्यांच्या कुटुंबियांसह पाहिले. दोन्ही कुटुंबांचा फोटोसाठी पोझ देतानाचा फोटो समोर आला आहे. या फोटोंनी आता सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (sonakshi sinha wedding)
काल रात्री ही दोन्ही कुटुंब नवऱ्या मुलाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये सिन्हा व इक्बाल कुटुंब एकत्र दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो पाहून प्रत्येकजण दोन्ही कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव करत आहे. सोनाक्षी सिन्हा या फोटोंमध्ये पांढऱ्या ड्रेसमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये नववधूच्या चेहऱ्यावर लग्नाचा ग्लो आलेला पाहायला मिळत आहे.
या फोटोत शत्रुघ्न सिन्हा, पूनम सिन्हा, झहीर इक्बाल आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘मॅड हाउस’ असे कॅप्शन दिले आहे. हे फोटो पाहून दोघांच्या लग्नाच्या फोटोंकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. शत्रुघ्न सिन्हा त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला उपस्थित नसल्याच्या बातम्यांदरम्यान, त्यांचा पहिल्यांदाच एकत्र फोटो समोर आला आहे. यावेळी त्यांनी त्यांचा जावई झहीर इक्बालबरोबरही फोटोसाठी पोजही दिल्या.
लग्नातल्या उपस्थितीतीबाबत बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, “हे कोणाचे आयुष्य आहे?. हे फक्त माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचे आयुष्य आहे. ज्याचा मला खूप अभिमान आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. ती मला तिच्या शक्तीचा आधारस्तंभ म्हणते. त्यामुळे तिच्या लग्नाला मी नक्कीच उपस्थित राहीन. मी का असू नये आणि मी का नसावे?. तिचा आनंद हाच माझा आनंद आणि माझा आनंद हाच तिचा आनंद. तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे”.