शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘शिवा’ने खऱ्या आयुष्यात लग्नानंतर कधीच वटपौर्णिमा साजरी केली नाही कारण…; स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “एक उपवास केल्यामुळे…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 21, 2024 | 3:35 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shiva serial fame Purva Kaushik give the reason for not celebrating Vatpournima after her marriage.

'शिवा'ने खऱ्या आयुष्यात लग्नानंतर कधीच वटपौर्णिमा साजरी केली नाही कारण…; स्वतःच केला खुलासा, म्हणाली, "एक उपवास केल्यामुळे…"

‘वटपौर्णिमा’ हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास नवऱ्याचे आयुष्य वाढते अशी मान्यता आहे. त्यामुळे आजचा हा वटपौर्णिमेचा सण अगदी सर्वसामान्य महिलांपासून ते मालिकेतील अभिनेत्रींपर्यंत जवळपास सगळ्याच जणी साजरा करत आहेत. अशातच झी मराठी वहिनीवरील ‘शिवा’ मालिकेतही हा हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे.

झी मराठीवरील मालिकांच्या वटपौर्णिमा स्पेशल भागानिमित्त ‘इट्स मज्जा’ने ‘शिवा’ मालिकेच्या ‘शिवा’ म्हणजेच अभिनेत्री पूर्वा फडकेशी खास संवाद साधला. यानिमित्ताने पूर्वाने तिच्या ‘शिवा’ मालिकेतील भूमिकेबद्दल व तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल खास संवाद साधला. यावेळी पूर्वाला तिच्या खऱ्या आयुष्यातील वटपौर्णिमाबद्दल ही खास प्रश्न विचारण्यात आला. यावेळी पूर्वाने लग्नानंतर कधीच वटपौर्णिमा साजरी केली नसल्याचे कारण सांगितले आहे.   

याबद्दल बोलताना पूर्वाने असं म्हटलं की, “मी असं म्हणणार नाही की काही करावं लागतं किंवा काय. पण मी गोडाधोडाचं काहीतरी करते. पण मी काय असं फार महान करणार नाही. मालिकेत शिवा’ भूमिकेच्या माध्यमातून इतकं करत आहे की, खऱ्या आयुष्यात पूर्वाचंही होऊन जातं. त्यामुळे खरं सांगायचं झालं तर मी असं काही केलं नाही आहे”.

आणखी वाचा – ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणची लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा, नवऱ्याने सकाळीच दिलं गोड सरप्राइज, सुंदर फोटो समोर

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी लग्नाआधी फक्त एकमेव उपवास करायचे. लग्नाआधी मी फक्त गणपतीच्या दिवसांत हरतालिकेचा उपवास करायचे. पार्वतीने जो उपवास केला होता. तोच एक उपवास मी फक्त वर्षातून एकदा करते. कारण तो एक उपवास केल्यामुळे नवरा चांगला मिळतो असं म्हणतात आणि तो मला मिळाला”.   

आणखी वाचा – Video : बायको वडाची पूजा करण्यासाठी पोहोचताच प्रथमेश परबने शूट केला खास व्हिडीओ, क्षितिजा म्हणाली, “नवरोबा…”

दरम्यान, मालिकेत शिवा-आशू यांचे लग्न झाले असून त्यांच्या नात्यात आता आणखी नवीन काय वळण येणार? हे बघण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. तसेच वटपौर्णिमेच्या खास भागांची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: marathi actressmarathi entertainment newsPurva Kaushik
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Tujhyat Jeev Rangla fame Akshaya Deodhar shared a special video of her mother's 60th birthday celebration

अक्षया देवधरच्या आईच्या ६०व्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.