Bigg Boss Ott 3 : ‘बिग बॉस OTT 3’ ची घोषणा झाल्यापासून सर्वत्र बरीच चर्चा रंगली आहे. सलमान खानच्या पहिल्या पोस्टरसह नवीन सिझनची घोषणा करण्यापासून ते शेवटच्या क्षणी होस्ट बदलण्यापर्यंत, या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. तर अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर होस्टिंगची जबाबदारी स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, स्पर्धकांची यादीही ऑनलाइन समोर आली आहे.
बिग बॉस OTT 3′ चा प्रीमियर आज रात्री म्हणजेच संपन्न होणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ या लोकप्रिय रिॲलिटी शोचा तिसरा सीझन २१ जूनपासून JioCinema वर प्रसारित होणार आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांना २४/७ हा सिझन पाहता येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हा शो दररोज रात्री ९ वाजता प्रसारित होईल.
‘बिग बॉस ओटीटी 3’ मधील स्पर्धक ‘द खबरी रिपोर्टच्या अनुसार’ काय करतात?
लव कटारिया सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
नीरज गोयत बॉक्सर
सना मकबूल अभिनेत्री
साई केतन अभिनेता
नैजी रैपर
पौलोमी दास अभिनेत्री
अरमान मलिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
पायल मलिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
कृतिका मलिक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
शिवानी कुमारी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर
सना सुल्ताना अभिनेत्री
दीपक चौरसिया पत्रकार
चंद्रिका दीक्षित वड़ा पाव गर्ल
विशाल पांडेय सोशल मीडिया सेंसेशन
‘बिग बॉस OTT 3’ स्पर्धक अभिनेता रणवीर शौरी, लव कटारिया, सना मकबुल, साई केतन राव, पाउलोमी पोलो दास व मुनिषा खटवानी ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यांच्याबरोबर शिवानी कुमारी, विशाल पांडे, अरमान मलिक आणि त्याच्या दोन बायका आणि सना सुलतान सारख्या सोशल मीडिया इन्फ्लूएंसरही असतील. या सर्वांशिवाय चंद्रिका दीक्षित, पत्रकार दीपक चौरसिया, रॅपर नेझी आणि कुस्तीपटू नीरज गोयत यांचा ‘बिग बॉस’ ओटीटीच्या घरात प्रवेश होण्याची शक्यता आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत, सेट डिझायनर ओमंग कुमार आणि त्याची पत्नी वनिता यांनी खुलासा केला की, त्यांनी ‘बिग बॉस ओटीटी सीझन 3’साठी एक कल्पनारम्य जग तयार केले आहे.ते म्हणाले की “‘बिग बॉस ओटीटी 3’ च्या घरात ड्रॅगन, युनिकॉर्न, कुलूप, चाव्या, सर्व काही आहे आणि काही योद्धे देखील असतील, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडलेले आहेत.