सोनाक्षी सिन्हा ही गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक बॉलीवुड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र सध्या ती कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर तिच्या लग्नामुळे खूप चर्चेत राहीली. बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकली. दुसऱ्या धर्मात लग्न केल्यामुळेही मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली होती. तसेच तिच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता असेही म्हंटले गेले मात्र सोनाक्षीचे आई-वडील शत्रुघ्न सिन्हा व पुनम सिन्हा यांची उपस्थिती बघायला मिळाली. तिच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा तिचे काही फोटो समोर आले आहेत. (sonakshi sinha and zaheer iqbal honeymoon)
सोनाक्षी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. लग्नाच्या सात दिवसानंतर दोघंही एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. सोनाक्षीने झहीरबरोबरचा एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघंही स्विमिंग पूलशेजारी वेळ घालवताना दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या फोटोला चाहत्यांचीदेखील खूप पसंती मिळत आहे.

सोनाक्षी व झहीरने २३ जून रोजी हिंदू व मुस्लिम पद्धतीने लग्न करता नोंदणी पद्धतीने विवाह केला. त्यानंतर संध्याकाळी मुंबईतील ‘बॅस्टीयन रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन केले होते. यासाठी सलमान खान, रेखा, काजोल यांच्यासहित अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. लग्नानंतर सोनाक्षी तिचा धर्म बदलणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र ती धर्म बदलणार नाही हे झहीरच्या वडिलांनी स्पष्ट केले.
याचबरोबर सोनाक्षीच्या लग्नाला तिचे भाऊ हजर नव्हते. त्यावरुनही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली होती. लव सिन्हाने यावर आता भाष्य केले आहे. लवने सांगितले की, “मी लग्नात हजर न राहण्याचे कारण स्पष्ट आहे. काहीही झालं तरी मी काही लोकांबरोबर कधीही मिसळू शकत नाही”. याबरोबरच झहीरच्या सासरच्यांबद्दल लवच्या मनात चांगल्या भावना नाहीत असेही त्याने अस्पष्टपणे सांगितले होते.