मराठी मालिकाविश्व, रंगभूमी, तसेच चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे उमेश कामत. उमेशने आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. उमेशसह त्याची बायको म्हणजेच अभिनेत्री प्रिया बापट हे दोघे मराठी कलाविश्वातील क्युट जोडी म्हणून बरेच लोकप्रिय आहेत. नाटक, मालिका व चित्रपटांमध्ये एकत्र दिसलेली ही जोडी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर अनेक रिल्स व फोटो शेअर करतात. सोशल मीडियावर हे दोघे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात.
उमेशही त्याच्या सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. प्रिया-उमेश सध्या त्यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगानिमित्त लंडनला गेले आहेत. लंडनमध्ये ते त्यांच्या नाटकाशिवाय फिरण्याचाही आनंद घेत आहेत. त्यामुळे लंडनमधील खास ठिकाणी हे दोघे फोटो व व्हिडीओ शेअर करत आहेत. अशातच उमेशने लंडनमधील काही खास फोटो शेअर केले असून या फोटोखाली लिहीलेल्या कॅप्शनने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
उमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरील लंडनमधील काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो एका उंच टेकडीवर उभा आहे आणि त्याच्यामागे लंडनचा निसर्गरम्य नजारा पाहायला मिळत आहे. हे खास फोटो शेअर करत उमेशने असं म्हटलं आहे की, “बायकोच्या प्रेमापोटी टेकडी चढून गेलो आणि वर पोहोचताच त्या नजाऱ्याच्या प्रेमात पडलो”. उमेशने शेअर केलेल्या या फोटोला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – Video : पडद्यामागे तबला वाजवू लागले अरुण कदम, नाटकाच्या प्रयोगापूर्वी बॅकस्टेज धमाल, व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, शांत स्वभाव, समजूतदारपणा व सहज सुंदर अभिनय करत उमेशने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं आहे. तसेच चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. उमेश नुकताच ‘मायलेक’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याचबरोबर त्याचे सध्या रंगभूमीवर ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सुरु आहे. या नाटकालाही प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.