बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता ही इंडस्ट्रीतील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही मुद्द्यावर उघडपणे आपलं मत मांडायला त्या मागेपुढे पाहत नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. मुलगी मसाबाच्या घटस्फोटाबाबतही तो बोलला आहे. आता त्यांच्या संभाषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Neena Gupta On Her Daughter Divorce)
रणवीर अलावादियासह झालेल्या संवादादरम्यान नीना गुप्ता यांनी स्त्रीवादावर आपले मत व्यक्त केले. मंटेनापासून मसाबाच्या घटस्फोटाबद्दलही त्यांनी यावेळी भाष्य केलं. याबद्दल बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, “मसाबाला आधी लग्न करायचे नव्हते. तिला तिच्या भावी पतीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते”. पुढे नीनाने सांगितले की, “त्यांनी लेकीला त्याच्याशी लग्न करण्यास सांगितले होते. नीना गुप्ता यांनी ही चूक असल्याचे मान्य केले आणि ते वेगळे झाले असल्याचं सांगितलं”.
नीना गुप्ता म्हणाल्या की, “तिचे मन दुखावलं आहे. असं काही होईल याची कल्पनाही तिने केली नव्हती, कारण तिचा नवरा व तिचं एकमेकांवर खूपz प्रेम होते”. ती पुढे म्हणाली, “मंटेना खरोखरच खूप चांगली व्यक्ती होती. त्यांचं नाही जमलं तर नाही जमलं. या धक्क्यानंतर मसाबा महिनाभर सुन्न झाली होती. तो काळ खूप कठीण होता. ते आपल्या हातात नाही, ते दुसऱ्याचे जीवन आहे”.
नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा हिने मधु मंटेना यांच्यासह घटस्फोट घेतला. त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी सत्यदीप मिश्राबरोबर लग्न केले. मसाबा ही नीना व वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनासह लग्न केले, पण २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर तिने २७ जानेवारी २०२३ रोजी अभिनेता सत्यदीप मिश्राबरोबर लग्न केले.