सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल सुरू आहे. हिंदीसह मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी लग्नगाठ बांधत आहेत. नुकतंच अभिनेता प्रसाद जवादे व अमृता देशमुख यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. पुण्यात त्यांच्या लग्नाचा शाही सोहळा पार पडला. अशातच आता गायक आशिष कुलकर्णी व गायिका-अभिनेत्री स्वानंदी टीकेकर हेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्या प्रेमाची कबुली देत त्यांनी प्रेम जाहीर केलं होतं. यानंतर त्यांच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे. (Swanandi Tikekar And Ashish Kulkarni Shared Kelvan’s Photo Viral)
नुकताच त्यांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. स्वानंदी व आशीष या दोघांच्या घरच्यांनी हा केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे काही खास क्षण स्वानंदी-आशिषने आपल्या इन्स्टग्राम स्टोरीद्वारे शेअर केले. या फोटोमध्ये आशिष-स्वानंदीचे कुटुंबीय दिसत आहेत. त्यांच्या केळवणात कुटुंबीय चांगलेच आनंदी व उत्साही दिसत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुकन्या मोने यांनी स्वानंदी-आशिष यांच्या पहिल्या केळवणाचे आयोजन केले होते. या केळवणाचे काही खास फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आणखी वाचा – कतरिना कैफ, रश्मिका मंदानानंतर आलिया भट्टचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल, अश्लील हातवारे करतानाचं दृश्य समोर
काही महिन्यांपूर्वीच स्वानंदी-आशिष यांनी सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले होते. ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी अगदी दिमाखात त्यांचा साखरपुडा संपन्न झाला. आता लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत. स्वानंदी-आशिष यांचं लग्न डिसेंबरमध्ये होणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान त्यांच्या लग्नाची तारीख व ठिकाण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या लग्नासाठी चाहते आतुर असल्याचे पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “महिलांनाच पुरुषांची जास्त गरज कारण…”, नीना गुप्तांचं मोठं विधान, म्हणाल्या, “माझा बॉयफ्रेंड नव्हता तेव्हा…”
अभिनेत्री स्वानंदी टीकेकर ही ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर ‘अस्सं माहेर नको गं बाई’, ‘अगं अगं सुनबाई…’ या मालिकेत स्वानंदीने मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच स्वानंदीचा होणार नवरा आशिष कुलकर्णी हा उत्तम गायक आणि गीतकार आहे. तो ‘इंडियन आयडल’च्या गेल्या पर्वात सहभागी झाला होता. या गाण्यातून अनेक उत्तमोत्तम गाणी गात प्रेक्षकांची व रसिकांची मनं जिंकली.