अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपट, गाण्यांमधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. अभिनयाबरोबरच ती तिच्या वक्तव्यांमुळेही नेहमी चर्चेत असते. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील होते. काही दिवसांपूर्वी तिच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. याबद्दलचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. मात्र आता सस्त्रक्रियेनंतर तिने मुंबईमध्ये न राहता दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. दुबईला गेल्यानंतरही ती आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. नुकतेच तिने ‘बिग बॉस ओटीटी’मधील अरमान मलिक व त्याच्या दोन पत्नींबद्दल भाष्य केले होते. आता मात्र तिने आपल्या शस्त्रक्रियेबद्दल भाष्य केले आहे. (rakhi sawant on being mother)
राखीने नुकताच ‘टेलि टॉक इंडिया’ला मुलाखत दिली. यामध्ये तिने ट्यूमरबद्दल बोलताना सांगितले की, “डॉक्टर्सना वाटलं होतं की तो हृदय विकाराचा झटका आला आहे. पण नंतर त्यांना माझ्या पोटात १० सेंटीमीटरचा ट्यूमर मिळाला. मला पोटात इतका त्रास का होत आहे? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यानंतर त्यांनी माझ्यावर शस्त्रक्रिया केली आणि माझ्या पोटातील ट्यूमर काढला. शस्त्रक्रियेनंतर मी कोमात होते आणि नंतर मला आयसीयुमध्ये ठेवण्यात आले”.
यानंतर ती म्हणाली की, “खूप दु:ख आहे. पण याचा सामना मात्र करावाच लागेल. आता मी सरोगसीचा विचार करेन. मी बाळ दत्तकडेखील घेऊ शकत आहे. मी विकी डोनरसारखं काहीतरी करेन. वारस असला पाहिजे”. तिच्या शस्त्रक्रियेच्या खर्चाबद्दलही तिने काही खुलासे केले आहेत. ती म्हणाली की, “माझ्या शास्त्रक्रियेचा खर्च अभिनेता सलमान खानने केला. तो कधीही त्याच्या लोकांना विसरत नाही. कोणाला काहीही न सांगता मदत करतो. त्याने माझ्या उपचाराच्या खर्चामध्ये खूप मदत केली”.
दरम्यान राखीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती नुकतीच ‘मस्त मे रेहने का’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर जॅकी श्रॉफ, नीना गुप्ता असे कलाकार दिसून आले होते. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.