मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कधीच आई होऊ शकणार नाही राखी सावंत, अभिनेत्रीला दुःख अनावर, म्हणाली, “विकी डोनरसारखं…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 8, 2024 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rakhi sawant on being mother

कधीच आई होऊ शकणार नाही राखी सावंत, अभिनेत्रीला दुःख अनावर, म्हणाली, "विकी डोनरसारखं…"

अभिनेत्री राखी सावंत ही नेहमी चर्चेत असते. आजवर तिने अनेक चित्रपट, गाण्यांमधून प्रेक्षकांच्या समोर आली आहे. अभिनयाबरोबरच ती तिच्या वक्तव्यांमुळेही नेहमी चर्चेत असते. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील होते. काही दिवसांपूर्वी तिच्यावर एक शस्त्रक्रिया झाली होती. याबद्दलचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. मात्र आता सस्त्रक्रियेनंतर तिने मुंबईमध्ये न राहता दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. दुबईला गेल्यानंतरही ती आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. नुकतेच तिने ‘बिग बॉस ओटीटी’मधील अरमान मलिक व त्याच्या दोन पत्नींबद्दल भाष्य केले होते. आता मात्र तिने आपल्या शस्त्रक्रियेबद्दल भाष्य केले आहे. (rakhi sawant on being mother)

राखीने नुकताच ‘टेलि टॉक इंडिया’ला मुलाखत दिली. यामध्ये तिने ट्यूमरबद्दल बोलताना सांगितले की, “डॉक्टर्सना वाटलं होतं की तो हृदय विकाराचा झटका आला आहे. पण नंतर त्यांना माझ्या पोटात १० सेंटीमीटरचा ट्यूमर मिळाला. मला पोटात इतका त्रास का होत आहे? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. त्यानंतर त्यांनी माझ्यावर शस्त्रक्रिया केली आणि माझ्या पोटातील ट्यूमर काढला. शस्त्रक्रियेनंतर मी कोमात होते आणि नंतर मला आयसीयुमध्ये ठेवण्यात आले”.

आणखी वाचा – लग्नानंतरही ऋषी कपूर यांचं सुरु होतं अफेअर, नीतू कपूर यांनी म्हटलं होतं वन नाइट स्टँड, म्हणालेल्या, “त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं कारण…”

View this post on Instagram

A post shared by Photo Raaj ???? (@photoraaj)

यानंतर ती म्हणाली की, “खूप दु:ख आहे. पण याचा सामना मात्र करावाच लागेल. आता मी सरोगसीचा विचार करेन. मी बाळ दत्तकडेखील घेऊ शकत आहे. मी विकी डोनरसारखं काहीतरी करेन. वारस असला पाहिजे”. तिच्या शस्त्रक्रियेच्या खर्चाबद्दलही तिने काही खुलासे केले आहेत. ती म्हणाली की, “माझ्या शास्त्रक्रियेचा खर्च अभिनेता सलमान खानने केला. तो कधीही त्याच्या लोकांना विसरत नाही. कोणाला काहीही न सांगता मदत करतो. त्याने माझ्या उपचाराच्या खर्चामध्ये खूप मदत केली”.

आणखी वाचा – “आमचा रिचार्ज जस्टिन बीबरच्या पाकिटात गेला”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अंबानी कुटुंबियांना टोला, म्हणाली, “आम्हाला सगळं कळतं…”

दरम्यान राखीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती नुकतीच ‘मस्त मे रेहने का’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर जॅकी श्रॉफ, नीना गुप्ता असे कलाकार दिसून आले होते. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.  

Tags: expenserakhi sawantsalman khantreatment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Karan Johar Reveals Children Questions

"आम्हाला जन्म नक्की कोणी दिला?", करण जोहरला त्याचीच मुलं विचारतात विचित्र प्रश्न, म्हणाला, "अशावेळी मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.