बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने आई झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली आहे. आई झाल्यानंतर आठवड्यानंतर तिने मुलीला स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर लगेचच तिने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिचा लूक बघून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिचे मॅटर्निटी फोटोशूट चांगलेच चर्चेत आले आहे. अशातचा तिची एक मुलाखत मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. नुकत्याच तिने दिलेल्या मुलाखतीमध्ये गरोदर असतानाचे काही प्रसंग शेअर केले आहेत. यामध्ये तिने गरोदर असल्याचे माहीत नसल्याचे तिने सांगितले असल्याने चाहत्यांना आश्चर्य वाटले आहे. (radhika apte on pregnancy)
एका मुलाखतीदरम्यान राधिका म्हणाली की, “हा एक वेडेपणा आहे. मला हे सार्वजनिक करायचे नाही. पण हे नक्की कसं काय झालं? हा एक विनोदच आहे. ही काही दुर्घटना नव्हती. पण आम्ही बाळासाठी प्रयत्नदेखील करत नव्हतो. आमच्यासाठीदेखील हा एक धक्का होता”. नंतर ती म्हणाली की, “मला वाटत की ज्या लोकांना मूल हवं की नाही? हे माहीत असतं तेव्हा या सगळ्या गोष्टी सोप्या असतात. पण आम्हाला बाळाची अपेक्षा नव्हती. पण हे सगळं कसं होणार याबद्दलची उत्सुकता मात्र होती. त्यांनंतर आम्ही पुढे प्रयत्न करण्यास काहीही हरकत नाही असा विचारदेखील केला”.
राधिका तिचे खासगी आयुष्य लाईमलाइटपासून दूर ठेवते. पण ‘बीएफआय लंडन फिल्म फेस्टिवल’मध्ये राधिकाने रेड कार्पेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली तेव्हा तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान वोग मॅगझिनच्या शूटबद्दल बोलताना राधिका म्हणाली, “मुलाच्या जन्माच्या एक आठवडा आधी मी हे फोटोशूट केले आहे”.
पुढे ती म्हणाली की, “सत्य हे आहे की त्या वेळी मी ज्या पद्धतीने बघितले ते स्वीकारण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला. मी स्वत: इतके वाढलेले वजन कधीच पाहिले नव्हते. माझे शरीर सुजले होते, माझ्या ओटीपोटात तीव्र वेदना होत होत्या आणि झोपेच्या कमतरतेमुळे प्रत्येक गोष्टीकडे माझा दृष्टीकोन बिघडला होता. आता आई होऊन दोन आठवडेही झाले नाहीत, माझे शरीर पुन्हा वेगळे दिसू लागले आहे”.