शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला पोहोचली प्रियांका चोप्रा, सोशल मीडियाद्वारे शेअर केले फोटो, अभिनेत्रीच्या साधेपणाचं कौतुक

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 20, 2025 | 3:18 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
priyanaka chopra at mahakumbh 2025

प्रियांका चोप्रा महाकुंभसाठी प्रयागराज येथे दाखल

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. सध्या ती बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र ती अनेकदा भारतात येत असते. सध्या ती महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने भारतात आली आहे. १४४ वर्षांनी आलेल्या या महाकुंभला भाविकांनी कोट्यावधी संख्येने गर्दी केली आहे. १३ जानेवारी रोजी सुरु झालेला हा महाकुंभ मेळा सुरु झाला आहे. हा मेळा २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहे. भारत तसेच जगभरातून अनेक भाविक येथे पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. अशातच आता प्रियांका चोप्रा देखील महाकुंभमध्ये दाखल झाली आहे. याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. (priyanaka chopra at mahakumbh 2025)

प्रियांका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर प्रयागराज येथील एक फोटो शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघून अभिनेत्री महाकुंभसाठी जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अभिनेत्रीने हा व्हिडीओ कारमध्ये बसून शूट केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये शहराची झलकदेखील बघायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रियांका महाकुंभमध्ये खरच दाखल होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा – Chhaava Movie : विकी कौशलचे ‘छावा’मधील रौद्र रुप समोर, लूकने वेधलं लक्ष, प्रेक्षकांना ट्रेलरची प्रतिक्षा

प्रियांका अनेकदा धर्माबाबत जागरूक असते. परदेशात राहूनदेखील ती भारतीय सण आनंदाने साजरे करताना दिसते. याआधीही ती भारतात आयोध्या येथे श्रीराममंदिरात आली होती. नवरा निक जोनास व मुलगी मालतीदेखील तिच्याबरोबर होते. यावेळी तिने सहकुटुंब श्रीरामाचे दर्शन घेतले होते. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघायला मिळाले.

आणखी वाचा – अक्षय कुमार दाक्षिणात्य चित्रपटात साकारणार भगवान शंकरांची भूमिका, पहिला लूक समोर, तर प्रभास साकारणार नंदी

प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती सध्या हॉलिवूड सीरिजमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती बॉलिवूडमध्ये काम करताना दिसली नाही. २०१६ साली तिचा ‘स्काय इज पिंक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात तिच्याबरोबर फरहान अख्तर व जायरा वसिम हे कलाकार दिसून आले होते. लवकरच ती ‘द ब्लफ’, ‘सिटाडेल सीजन २’ व ‘जोनस ब्रदर्स यांच्याबरोबर एका चित्रपटात दिसून येणार आहे.

Tags: bollywood actressmahakumbh 2025priyanka chopra
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Amol Naik New Business

'तुझ्यात जीव रंगला' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, व्हिडीओद्वारे दिली गुडन्यूज, कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.