गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी कल्की अवतार पाहिलाय आणि…”, ममता कुलकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या, “माझं गोत्रही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 2, 2025 | 11:04 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mamta kulkarni statement

“मी कल्की अवतार पाहिलाय आणि...”, ममता कुलकर्णींचं मोठं विधान, म्हणाल्या, “माझं गोत्रही...”

बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णींनी बॉलिवूडला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला. प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभ मेळ्यामुळे त्या बऱ्याच चर्चेत राहिल्या. किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर पदवी ममता यांना देण्यात आली होती. त्यानंतर बऱ्याच वादाला तोंड फुटलं. कलाक्षेत्रात अभिनेत्री म्हणून काम करत असताना महामंडलेश्वर पदवी दिलीच कशी? अशा अनेक चर्चा रंगल्या. त्यानंतर ममता यांनी स्वतःहूनच महामंडलेश्वर पदवी पुन्हा देऊ केली. २५ वर्ष तपस्या केल्यानंतर देवानेच मला ही पदवी दिली असल्याचं ममता यांचं म्हणणं होतं. आता पुन्हा एकदा ममता यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा रंगत आहे. (mamta kulkarni statement)

किन्नर आखाडा महामंडलेश्वर ममता सध्या बऱ्याच चर्चेत आहेत. अभिनयक्षेत्रापासून दूर असल्या तरी त्या अध्यात्माकडे वळल्या आहेत. भगवे कपडे, कपाळी मोठा टिळा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, मोकळे केस असा ममता यांचा लूक व्हायरल होताना दिसतो. आताही त्या काल्किधाम येथे पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी या पवित्र स्थानी शिलादानही केले. दर्शनानंतर ममता यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेलं विधान अधिक चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा – सुंदर सजावट, समुद्र किनारा अन्…; ‘आई कुठे…’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडीओ समोर, पत्नी कोण आहे?

View this post on Instagram

A post shared by Mamta Kulkarni (@mamtakulkarniofficial1972)

ममता म्हणाल्या, “लोकांना सनातन धर्माशी जोडण्याचं माझं काम आहे. धर्माची स्थापना झाली पाहिजे. तसेच अधर्मचा नाश व्हायला हवा. परशुरामजी, ऋषी जमदग्नी यांच्या वंशातली मी आहे. परशुराम हे कल्कीचे गुरु होते. जेव्हा मी समाधी घेतली तेव्हाच मी कल्की अवतार पाहिला आहे. ते अमर आहेत. माझे काही जुने चांगले कर्म आहेत. त्यामुळेच मला शिलादान करण्याचं सौभाग्य मिळालं”.

आणखी वाचा – ‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

याआधीही ममता यांनी केलेली काही विधानं वादाचा विषय ठरली होती. महामंडलेश्वर पदवी मिळाल्यानंतर त्यांच्याबाबत अनेक वाद उफाळून आले. महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान करायला गेले आणि महामंडलेश्वर पदवी मिळाली असं ममता यांचं म्हणणं होतं. २५ वर्ष तपश्चार्या केल्यानंतर मला देवाने हे सगळं दिलं असाही दावा त्यांनी केला. ममता यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी २५ वर्ष तपश्चार्या केली.

Tags: bollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Siddharth Chandekar Mother New Business

सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, आईसाठी अभिनेत्याची खास पोस्ट, म्हणाला, "हे नवं दुकान…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.