बॉलिवूडमधील मलायका अरोरा ही अभिनेत्री या वर्षी खूप चर्चेत राहिली आहे. मलायकाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेली बघायला मिळत आहे. मात्र तिने एक नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे. त्यामुळे ती लवकरच एक बीजनेस वुमन बनू शकते अशीही चर्चा होताना बघायला मिळते. मलायका व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा अभिनेता अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअप झाला. तसेच यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिच्या वडिलांचेदेखील निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर ती संपूर्णपणे कोसळली होती. मात्र अर्जुनने तिला धीर दिल्याचेही दिसले. यावेळी पुन्हा एकदा अर्जुन व मलायका यांच्या नात्यावर चर्चा सुरु झाली होती. (malaika arora viral post)
दरम्यान आता नवीन वर्षांचे सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत. अनेक जण नवीन वर्षात काय करायचे? काय करायचे नाही? याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मलायकानेदेखील सरत्या वर्षाला निरोप देताना तसेच नवीन वर्षांच्या स्वागतासाठी तिने एक पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्ट करत लिहिले की, “२०२४, मला तुझा तिरस्कार नाही. पण माझ्यासाठी खूप कठीण राहिले आहे. खूप आव्हाने, बदल व शिकवण मला मिळाली. आयुष्य एका क्षणात बदलू शकते हे तू मला शिकवलेस. तसेच स्वतःवर विश्वास ठेवायलादेखील शिकवलेस”.
पुढे तिने लिहिले की, “पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे आरोग्य, म्हणजे ते शारीरिक, मानसिक असो हे सगळं महत्त्वाचं असल्याचे अधिक शिकवलंस. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला अजूनही लक्षात आल्या नाहीत. मला विश्वास आहे की वेळेबरोबरच प्रत्येक गोष्टीमागंचं कारण मला समजेल”.
२०१८ पासून मलायका व अर्जुन यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. सुरवातीला त्यांनी नात्यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांनी सगळ्यांसमोर नातं स्वीकारलं. दोघंही अनेक ठिकाणी एकत्रितपणे असलेले दिसून यायचे. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघायला मिळायचे. मात्र या ब्रेकअपच्या दु:खातून तिने स्वतःला चांगलेच सावरले आहे.