रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअप आणि वडिलांच्या निधनावर मलायका अरोराची वर्षाची पोस्ट, म्हणाली, “२०२४ बद्दल तिरस्कार नाही पण…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 31, 2024 | 4:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
malaika arora viral post

मलायका अरोराची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

बॉलिवूडमधील मलायका अरोरा ही अभिनेत्री या वर्षी खूप चर्चेत राहिली आहे. मलायकाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेली बघायला मिळत आहे. मात्र तिने एक नवीन रेस्टॉरंट सुरु केले आहे. त्यामुळे ती लवकरच एक बीजनेस वुमन बनू शकते अशीही चर्चा होताना बघायला मिळते. मलायका व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा अभिनेता अर्जुन कपूरबरोबर ब्रेकअप झाला. तसेच यावर्षी सप्टेंबर महिन्यात तिच्या वडिलांचेदेखील निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर ती संपूर्णपणे कोसळली होती. मात्र अर्जुनने तिला धीर दिल्याचेही दिसले. यावेळी पुन्हा एकदा अर्जुन व मलायका यांच्या नात्यावर चर्चा सुरु झाली होती. (malaika arora viral post)

दरम्यान आता नवीन वर्षांचे सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत. अनेक जण नवीन वर्षात काय करायचे? काय करायचे नाही? याबद्दलच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मलायकानेदेखील सरत्या वर्षाला निरोप देताना तसेच नवीन वर्षांच्या स्वागतासाठी तिने एक पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्ट करत लिहिले की, “२०२४, मला तुझा तिरस्कार नाही. पण माझ्यासाठी खूप कठीण राहिले आहे. खूप आव्हाने, बदल व शिकवण मला मिळाली. आयुष्य  एका क्षणात बदलू शकते हे तू मला शिकवलेस. तसेच स्वतःवर विश्वास ठेवायलादेखील शिकवलेस”.

आणखी वाचा – “तेव्हा व्यक्त नाही झाली आणि आता…”, प्राजक्ता माळी प्रकरणावर सुप्रसिद्ध अभिनेत्रीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महिला म्हणून आवाज उठवण्यापेक्षा…”

पुढे तिने लिहिले की, “पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझे आरोग्य, म्हणजे ते शारीरिक, मानसिक असो हे सगळं महत्त्वाचं असल्याचे अधिक शिकवलंस. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला अजूनही लक्षात आल्या नाहीत. मला विश्वास आहे की वेळेबरोबरच प्रत्येक गोष्टीमागंचं कारण मला समजेल”.

आणखी वाचा – जामनगरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, मात्र शाहरुखने लपवला चेहरा, नेटकरी म्हणाले, “तोंड लपवलं कारण…”

२०१८ पासून मलायका व अर्जुन यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. सुरवातीला त्यांनी नात्यावर काहीही बोलण्यास नकार दिला होता. मात्र नंतर त्यांनी सगळ्यांसमोर नातं स्वीकारलं. दोघंही अनेक ठिकाणी एकत्रितपणे असलेले दिसून यायचे. त्यांचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले बघायला मिळायचे. मात्र या ब्रेकअपच्या दु:खातून तिने स्वतःला चांगलेच सावरले आहे.  

Tags: bollywood actressmalaika aroraviral post
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Late actor Ramesh Bhatkar wife Mridula commented on her son absence of name in wedding invitation card

स्वत:च्या मुलाच्या लग्नपत्रिकेत नव्हतं रमेश भाटकरांचे नाव, पत्नीने सांगितलं नेमकं कारण, म्हणाल्या, "तो आरोपी नव्हता पण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.