शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घटस्फोट झाला पण संसार थाटला नाही म्हणून अभिनेत्रींनाच ठरवलं गेलं दोषी, वारंवार असं का घडतं?

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 10, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
divorce blame on wives

'या' अभिनेत्री घटस्फोटासाठी जबाबदार?

मनोरंजन क्षेत्रात सध्या घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढलं आहे. नुकताच रीलस्टार, अभिनेत्री धनश्री वर्मा व क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे. या घटस्फोटासाठी धनश्री जबाबदार असल्याचे म्हंटले जात आहे. याबद्दलच्या पोस्टदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. मात्र अनेकांनी धनश्रीला पाठिंबादेखील दर्शवला आहे. मात्र याआधी क्रिकेट विश्वातील खेळाडू हार्दिक पांड्या व मॉडेल नताशा स्टॅन्कोव्हिक यांनी देखील वेगळे होणार असल्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे ते वेगळेदेखील झाले. मात्र मुलगा अगस्त्यच्या निमित्ताने दोघं एकत्रदेखील येतात. या घटस्फोटासाठीदेखील नताशाला जबाबदार धरण्यात आले होते. मनोरंजन क्षेत्रात अशा अनेक जोड्या वेगळ्या झाल्या ज्यासाठी महिलांना जबाबदार ठरवले. (divorce blame on wives)

या लिस्टमध्ये ‘हिरामंडी’ वेबसीरिजमधून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे संजीदा शेख. अभिनेता अमीर अलीबरोबर ती लग्नबंधनात अडकली होती. मात्र त्यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर अभिनेत्रीचे बाहेर अफेअर असल्याचा आरोप केला जाऊ लागला. त्यावेळी तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. संजीदाला मुलगी असून ती एकटी मुलीचा सांभाळ करत आहे.

आणखी वाचा – “निर्मात्यांना उमेशबरोबर चित्रपट का करावा वाटत नाही?”, प्रिया बापटची खंत, म्हणाली, “छान काम करुनही…”

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अभिनेत्री मलायका आरोरा व अरबाज खान यांच्या घटस्फोटाची चर्चा खूप रंगली होती. लग्नाच्या १९ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. मलायकाचे बाहेर अफेअर चालू असल्याच्या चर्चादेखील मोठ्या प्रमाणात रंगल्या. अरबाज व मलायका यांना एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर मलायका व अर्जुन यांचे अफेअर होते. मात्र काही वर्षामध्येच त्यांचा ब्रेकअपदेखील झाला. सध्या मलायका सिंगल आहे.

आणखी वाचा – Video : अमृता खानविलकरचा नव्या घरात गृहप्रवेश, स्वामी समर्थांच्या फोटोसह एन्ट्री, व्हिडीओमध्ये दिसली संपूर्ण झलक

अभिनेता हृतिक रोशन व सुजॅन खान यांच्या घटस्फोटाची चर्चादेखील रंगली. त्यांचा घटस्फोट होऊन बराच काळ लोटला आहे. हृतिक व सुजॅन यांचे २००० साली लग्न झाले होते. मात्र काही कारणांमुळे त्यांच्यामध्ये दुरावा येऊ लागला आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. सुजॅनने पोटगी घेण्यासाठी घटस्फोट घेतल्याचेही बोलले गेले. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू व नागाचैतन्य यांच्या घटस्फोटाची चर्चादेखील झाली. अधिक पोटगी घेण्यासाठी समंथाने घटस्फोट घेतला असे म्हंटले गेले. मात्र नागाच्या कुटुंबाने समंथाने एकही पैसा न घेतल्याचे स्पष्ट केले.    

Tags: dhanshree vermamalaika aroraSamantha ruth prabhu
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actor Pushkar Jog trolled after sharing a photo with Farhan Akhtar also he given a direct reply to the trollers.

"स्तुती करुन हिंदीमध्ये काम भेटेल तुला…", फरहान अख्तरबरोबरचा फोटो शेअर करताच मराठी अभिनेत्याला कमेंट, म्हणाला, "जे तोंडावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.