Amruta Khanvilkar Grihapravesh : घर घेणं आणि स्वतःच हक्काचं घर असणं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. घर घेण्याचं हे स्वप्न सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळीही पाहतात. आजवर सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांचं घर घेण्याचं हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आणखी एका अभिनेत्रीनं तिचं नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी शेअर केली होती. लक्ष्मीपूजनादिवशी अभिनेत्रीने नवं घर घेतलं असल्याची गुडन्यूज साऱ्यांना दिली. ही अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे नव्या घराची झलक चाहत्यांसह शेअर केली. या पाठोपाठ आता अभिनेत्रीने शेअर केलेल्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अमृताने थेट तिच्या नव्या घरातील गृह्प्रवेशाची खास झलक तिच्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर केली आहे. “नव्या वर्षाची, नवी सुरुवात. गृहप्रवेश केला आणि नव्या घराचा उंबरठा ओलांडला. स्वकष्टाने उभारलेलं हे आमचं ‘एकम’. ‘एकम’ म्हणजे एक. जिथून सगळंच नव्याने सुरु होतं. उत्सुकता, समाधान, प्रेम व डोळ्यात स्वप्नांचं आभाळ. तुमच्या शुभाशीर्वादांची साथ अशीच कायम राहू दे. नवीन वर्ष, एक नवीन सुरुवात. आम्ही आमच्या नवीन घरात प्रवेश केला. हे ‘एकम’ आहे. प्रेमाने, संयमाने मेहनत आणि समर्पणाने बांधलेले आमचे घर. कुतूहल, समाधान, प्रेम आणि आपल्या डोळ्यात स्वप्नांनी भरलेले आकाश”, असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – जिममध्ये रश्मिका मंदानाला दुखापात, सलमान खानसह ‘सिकंदर’चं शूट करताना घडली घटना, आता नेमकी परिस्थिती कशी?
या व्हिडीओमध्ये अमृताच्या नव्या घराची झलक पाहायला मिळत आहे. अमृताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सुरुवातीला अभिनेत्री कलशाची पूजा करत आहे. यावेळी अभिनेत्रीचा पारंपरिक व मराठमोळा लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये अमृताचे कुटुंबीय व नातेवाईकही या खास क्षणी तिच्याबरोबर आहेत. तर या घराला अभिनेत्रीने एकम असे नाव दिले आहे. अखेर ‘अनेक वर्षांपासूनचं स्वप्न सत्यात उतरलं’, असं म्हणत अमृता खानविलकरने मुंबईत आलिशान घर घेतलं आहे.
आणखी वाचा – बायकोच्या डोहाळ जेवणालाही जाऊ शकला नाही संग्राम साळवी, म्हणाला, “वाईट वाटलं पण…”
मराठीसह बॉलीवूड सिनेसृष्टीत अनेक चित्रपटांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत अमृताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अमृताचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावरुन ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बरेचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव ती चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.