Bollywood actress Mahima Chaudhary : बॉलिवूड अभिनेत्री महिला चौधरी आता मनोरंजन क्षेत्रात फारशी कार्यरत नसली तरी तिचे वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच चर्चेत असते. ५० वर्षांची महिमा एकाकी जीवन जगत आहे. ती एका मुलीची आई आहे. तिने आयुष्यात खूप दु:ख सोसले आहे. प्रेम, विश्वासघात आणि घटस्फोट याशिवाय तिला कॅन्सरसारख्या घातक आजारानेही ग्रासले आहे. उद्योगपती बॉबी मुखर्जीबरोबर लग्न करण्याआधी महिमाने टेनिसपटू लिएंडर पेसबरोबर रिलेशनमध्ये होती. मात्र, पेसकडून तिची फसवणूक झाल्यामुळे ती त्याच्याबरोबर स्थिरावू शकली नाही. महिमा चौधरीने सुभाष घई यांच्या ‘परदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा चाहतावर्ग हा प्रचंड मोठा आहे. पण ती अधिक चर्चेत आली लिएंडर पेसबरोबरच्या नातेसंबंधामुळे.(Mahima Chaudhary on her relationship)
महिमा व लिएंडर जवळजवळ ३ वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि महिमा नेहमीच टेनिसपटूच्या कायम पाठीशी उभी राहिली. पेस जेव्हा त्याचे सामने खेळत असे तेव्हा ती नेहमी स्टेडियममध्ये दिसायची. मात्र, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि अभिनेत्रीने ब्रेकअपचे कारण मॉडेल रिया पिल्लईबरोबरचे त्याचे अफेअर असल्याचे सांगितले. ‘मिस मालिनी’ला दिलेल्या मुलाखतीत महिमाने तिच्या पूर्वीच्या नात्याबद्दल भाष्य केलं. यावेळी ती असं म्हणाली की, “तो (लिएंडर पेस) एक चांगला टेनिसपटू असू शकतो, पण तो माझ्याशी चांगला वागला नाही. जेव्हा मला कळले की, तो कोणत्या दुसऱ्या मुलीबरोबर आहे, तेव्हा मला काही धक्का बसला नाही. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यावर काहीही परिणाम झाला नाही. मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. त्यामुळे मी बलवान झाले”.
पेसला रियाविरुद्ध घरगुती हिंसाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. रियाने २०१४ मध्ये लिएंडर पेसविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. कोर्टाचा निर्णय टेनिसपटू लिएंडर पेसच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे न्यायालयाने रियाला दरमहा १.५० लाख रुपये भत्ता देण्याचे आदेश दिले. पेसला रियाबरोबरचे आपले घर सोडायचे असेल तर त्याला मासिक भाडे ५०,००० रुपये द्यावे लागतील, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : चक्क भांडी घासायचा कोकण हार्टेड गर्लला ट्रॉमा, ढसाढसा रडलीही अन्…; कसा निभाव लागणार?
दरम्यान, लिएंडर पेसपासून वेगळे झाल्यानंतर महिमाने २००६ मध्ये उद्योगपती बॉबी मुखर्जीबरोबर लग्न केले. पण २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव एरियाना आहे. महिमाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर महिमा लवकरच कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.