गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मांसाहार सोडलं, दारू पिणंही बंद केलं अन्…”, माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने घटवलं १८ किलो वजन, काही खास टिप्स

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 24, 2025 | 1:09 pm
in Lifestyle
Reading Time: 3 mins read
google-news
Madhuri dixit husband weight loss journey

माधुरी दीक्षित यांच्या पतीने घटवलं तब्बल १८ किलो वजन, हे सगळं कसं शक्य झालं?

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे जगभरात लाखो चाहते आहेत. तिचा फिटनेस, सौंदर्य म्हणजे क्या बात… माधुरीचा फिटनेस व तिची व्यायाम करण्याची पद्धत तर अनेक तरुण मंडळींसाठीही प्रेरणा आहे. प्रत्येक भूमिकेनुसार माधुरी स्वतःला बदलते. मात्र या सगळ्यात तिच्या फिटनेसमध्ये कधीच बदल होत नाही. डॉ. श्रीराम नेने यांच्यासह लग्न केल्यानंतर ती बराच काळ परदेशात राहत होती. तिथेही तिने स्वतःला अगदी फिट ठेवलं. पुन्हा ती दोन्ही मुलांसह भारतात स्थायिक झाली आहे. आता माधुरीसह तिचे पती श्रीराम नेनेही त्यांच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देत आहेत. त्यांनी तब्बल १८ किलो वजन घटवलं आहे. वजन कसं कमी केलं? याबाबत नेनेंनी सांगितलं आहे. (madhuri dixit husband weight loss journey)

१८ किलो वजन कसं घटवलं?

डॉ. श्रीराम नेने हे कार्डियाक सर्जन आहेत. ते माधुरीसह विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसतात. इतकंच नव्हे तर युट्युबद्वारे विविध व्हिडीओ पोस्ट करत ते आरोग्यविषयक महत्त्वाच्या टिप्स देतात. मात्र त्यांचं स्वतःकडे बहुदा दुर्लक्ष होत होतं. श्रीराम यांच्या आरोग्य तपासणीमध्ये थोडीफार गडबड होती. दरम्यान मित्रांनीही त्यांना आरोग्याची अधिकाधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला. श्रीराम नेनेंनी यावेळी स्वतःकडे लक्ष देण्याचं ठरवलं.

आणखी वाचा – “हिंदू, हिंदू का करताय? सगळे एकच, मुसलमानही…”, पहलगाम हल्ल्याबाबत शत्रुघ्न सिन्हा बोलताच भडकले नेटकरी, प्रोपगंडा म्हणत…

View this post on Instagram

A post shared by Dr. Shriram Nene (@drneneofficial)

दारू सोडली आणि…

श्रीराम नेने म्हणाले, “९ ते १० महिन्यांपूर्वी मी पूर्णपणे मांसाहार खाणं सोडलं. तसेच दारू पिणंही बंद केलं. पूर्णपणे विगन होण्याचा निर्णय घेतला आणि तेच केलं. यामुळे माझं १८ किलो वजन कमी झालं. याचा चांगला परिणाम माझ्या शरीरावर झाला”. श्रीराम यांनी कठोरपणे सगळ्या नियमांचे पालन केलं. शारीरिकदृष्ट्या अधिक सुदृढ होण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांचा हा प्रयत्न अगदी यशस्वी झाला आहे. ते स्वतःसाठी डॉक्टर झाले असं श्रीराम यांचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – “माझा मित्र गेला आणि…”, पहलगाम हल्ल्यात सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गमावला जवळचा मित्र, म्हणाला, “मित्रा माफ कर…”

श्रीराम यांनी त्यांच्या वडिलांबाबतही असंच काहीसं केलं होतं. त्याच अनुभवाबाबत ते म्हणाले, “माझ्या वडिलांबाबातही मी असाच प्रयोग करुन पाहिला. या प्रयोगामुळे त्यांचीही तब्येत सुधारली. ५५ वर्षांपासून माझे वडील मधुमेहामुळे त्रस्त होते. त्यांची सगळं औषधं बंद करुन वैद्यकीय पद्धतींचा आधार घेतला”. श्रीराम यांचे वडील आता ८१ वर्षांचे आहेत आणि अगदी उत्तम आयुष्य ते जगत आहे. हे श्रीराम यांनी स्वतःच सांगितलं.

Tags: bollywood newsentertainment newsmadhuri dixit
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्याच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
pahalgam terror attack

“तेव्हा हिंदूंना रांगेत उभं करत गोळ्या मारल्या”, पहलगाम हल्ल्याबाबत विवेक अग्नीहोत्रींचं वक्तव्य, म्हणाले, “काश्मीर फाइल्समधून...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.