बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफ ही लोकप्रिय व सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर तिचे नाव अनेक आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर जोडले गेले. मात्र २०२१ साली तिने अभिनेता विकी कौशलबरोबर लग्न केले आणि सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कतरिना व विकी यांनी एकमेकांना काही वर्ष डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांचे लग्नाचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्याचप्रमाणे कतरिना गरोदर असल्याच्या चर्चादेखील मोठ्या प्रमाणात रंगतात. (katrina kaif on vicky kaushal)
नुकतेच दोघंही अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नात पाहायला मिळाले. यावेळी कतरिना गरोदर असल्याचे अंदाज सगळ्यांनी बांधले. कतरिनाच्या लाल रंगाच्या साडीमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधले. यावेळी दोघंही एकमेकांचे कौतुक करतानाही दिसले. कतरिनाच्या साध्या लूकचे कौतुकही करण्यात आले आहे. याबरोबरच विकी आता त्याच्या आगामी चित्रपट ‘बॅड न्यूज’मुळे अधिक चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये आता कतरिनाचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे.
कतरिनाने नुकताच ‘मिड डे’ ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तिने विकीबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केले होते. ती विकीला प्रेमाने काय हाक मारते हे देखील तिने सांगितले होते. ती म्हणाली की, “मी विकीला सगळ्यांसामोर बेबी तू ‘आर्टहाऊस फिल्म बफ’ आहेस, असे म्हणते. तो एक चांगला अभिनेता आहे व तो अधिक चांगल्या गोष्टी करण्याची क्षमता आहे”.
विकी सध्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटामध्ये दिसून येणआर आहे. हा चित्रपट १९ जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात एमी विर्क व तृप्ती डीमरी हे कलाकार मुख्य भूमिकांमद्धे दिसून येणआर आहेत. यामध्ये विकी विनोदी भूमिका करताना दिसणार आहे.